गोंदिया, दिनांक : ०१ ऑगस्ट : गोंदिया जिल्हा ओबीसी सेल राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी च्या वतीने दि. ०२ ऑगस्ट रोजी महापुरुषांचा अपमान करणाऱ्या मनोहर भिडे याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी. या मागणीसह निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्यात येणार आहे. एका खाजगी कार्यक्रमात मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचं तिव्र जाहिर निषेध! माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, राजलक्ष्मी तुरकर, यशवंत गणवीर, सुरेश हर्षे, पूजा अखिलेश सेठ, अविनाश जायस्वाल, रफिक खान, मनोज डोंगरे, योगेंद्र भगत, केतन तुरकर, गणेश बरडे, अजय गौर, मोहन पटले व सर्व सेल व आघाड्याचे जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर निषेध व आंदोलन करण्यात येणार आहे.