प्रशासनाचे दुर्लक्ष; आमदारांनी स्वतः जाऊन केली चौकशी


अर्जुनी मोर., दिनांक : ०१ ऑगस्ट : तालुक्यातील ग्राम झरपडा येथे मागील वर्षापासून रामचंद्र ठाकरे हे गावातील समाज मंदिरात आपले वास्तव्य करीत आहेत. मागच्या वर्षीच्या पावसाने त्यांच्या घराचे छत हरवून नेले त्या वेळी पासून ते गावातील समाज मंदिरात राहू लागले असता त्यांना त्यावर उपाययोजना करू अशी फक्त अशा दाखवली परंतु अजूनही ते समाज मंदिरातच राहत आहेत. याकडे कुणीही लक्ष देत नाही. तसेच याच पावसाच्या अती वर्षावामुळे मागील वर्षी मालन चौधरी यांच्या घराच्या मागील भीती कोसळल्या त्यावर फक्त तात्पुरती कारवाई करण्यात आली परंतु अजून ही निदान मात्र काढता आला नाही.

यावर्षी पूर्ण घर मोळकडीस येण्याच्या तयारीत आहे. तरीही प्रशासनाचा काहीही उपाय दिसला नाही. अशा परिवारांनी कस कराव. असा प्रश्न त्यांना निर्माण झाला शेवटी ही परिस्थिती अर्जुनी मोर क्षेत्राचे आमदार मनोहर चद्रिंकापुरे यांना कळली असता त्वरित जाऊन त्याने त्या परिवारास भेट दिली. दरम्यान त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळी मालन चौधरी वय ७० व रामचंद्र ठाकरे ७५ यांनी आमदार चांद्रिकापुरें यांना आपल्या समस्या सांगितल्या या समस्येचे निराकरण म्हणून आमदार यांनी तेथील तलाठी यांना लवकरात लवकर पंचनामा करून त्यांना मदत मिळवून देण्याची सूचना दिली. त्यवेली गावातील सामाजिक कार्यकर्त्ता निशा मस्के, माजी सरपंच तनुरेषा रामटेके उपस्थित होत्या.

  • साहेब मागील वर्षीपासून आम्ही या घरात अशाच परिस्थितीत वास्तव्य करीत आहोत. आम्ही आपल्या घरी माझे भाऊ, भावजय आणि शिक्षण घेत असलेले त्यांचे दोन मुले इथ राहतात. घराची अशी परिस्थिती असल्यामुळे रात्रीला झोप येत नाही. मुलांचा अभ्यास होत नाही. तलाठ्याकडे गेले असता तलाठी करून देतो असे उडते उत्तर देत असतो. मागील वर्षी गेले असता पंचनामा करायला स्वतः न येता आपल्या मदतीस ला पाठवत असतो. साहेब आता आम्ही जायचं कुठं?
  • : मालन चौधरी, ग्रामस्थ. ग्राम झरपडा.
  • साहेब मी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात जाऊ जाऊ थकलो. माझ्याकडे कुणीही लक्ष देत नाही. माझा घर पडला मी आपल्या कुटुंबासोबत व लहान लहान नातवंडं घेऊन समाज मंदिरात राहतो. मागील वर्षीपासून तरी सुद्धा माझी दाखल कुणी घेत नाही. काय करावं साहेब.
  • : रामचंद्र ठाकरे, ग्रामस्थ. ग्राम झरपडा. 

 

Leave a Comment

और पढ़ें