नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन सडक अर्जुनी येथे साजरा


  • मंचावरून बोलताना आमदार मनोहर चंद्रिकापुरे… 

सडक अर्जुनी, दि. 01 ऑगस्ट :  व्याघ्र प्रकल्प स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नवेगाव / नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दि. 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आशीर्वाद लॉन येथे साजरा करण्यात आला.

स्थानिक आयोजित कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी बोलताना . सुनील मेंढे, खासदार भंडारा गोंदिया यांनी विदर्भातील वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान मनोहरभाई पटेल महाविद्यालय साकोली येथील विद्यार्थ्यांनी विविध जागृतीपर कार्यक्रम सादर केले.

नवेगाव / नागझिरा व्याघ्र प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करणारे कर्मचारी, उत्कृष्ट ग्राम परिस्थितीकी विकास समिती, उत्कृष्ट मचाण, उत्कृष्ट संरक्षण कुटी, तसेच उत्कृष्ट निसर्ग मार्गदर्शक यांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रिकापुरे यांनी जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजुरांना पट्ट्या विषयी सविस्तर चर्चा केली. आपल्या जिल्ह्यात गरजूंना पट्टे मिळत नाही ,धनाड्य लोकांना पट्टे कसे मिळतात, याचा शोध आत्ता अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे,
असे सांगितले.

वाघ वाचेल तर जंगल वाचेल, यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी आमदार मनोहर चंद्रिकापुरे. राजकुमार बडोले, माजी मंत्री, जयरामे गौडा आर. क्षेत्र संचालक, निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक गोंदिया, प्रमोदकुमार पंचभाई, उपवनसंरक्षक गोंदिया, पवन जेफ, उपसंचालक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर, जिल्हा परिषद सदश्या, श्रीमती रचना गहाने, विभागिय वनाधिकारी प्रदीप पाटील, मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे, सावन बहेकार, इत्यादींनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात वाघाची संख्येत दिवसे दिवस वाढ होत आहे. पण नवेगाव नागझिरा अभयारण्यात वाघाच्या संख्येत वाढ होत नसल्याने खंत व्यक्त केली.
ई डी सी नागझिरा अभयारण्यातील पदाधिकारी, अशासकीय संस्थेचे पदाधिकारी, वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया, शालेय विद्यार्थी निसर्ग मार्गदर्शक , व्याघ्र प्रकल्पातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. सूत्रसंचालन वनरक्षक अरविंद बडगे यांनी केले तर आभार वनपरिक्षेत्र सचिन डोंगरवार नवेगाव/ बांध यांनी मानले.


 

Leave a Comment

और पढ़ें