- आ.विनोद अग्रवाल यांनी पार्टी मध्ये स्वागत करता जनतेचे कार्य करण्याचे सुचवले…
प्रतिनिधी/गोंदिया, दि. 30 जुलै : आमदारकिची जवाबदारी हाती घेताच आ. विनोद अग्रवाल यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले असून ते कार्य जनहिताचे असल्याने नेहमी त्यांच्या जनतेची पार्टी ( चाबी संगठन ) ला विश्वासात घेता अनेक इतर पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांचे प्रवेश झालेले आहे व ते जनतेची पार्टी चे सूत्र स्वीकारल्यानंतर काटोकारपणे जनतेची सेवा व पार्टी चे कार्य करीत आहेत. नुकतेच आ.विनोद अग्रवाल यांची दमदार कामगिरी पाहता कुडवा येथील त.मु.स. अध्यक्ष निलेश जगनित व कटंगी येथील माजी सरपंच पुरुषोत्तम राउत तसेच ग्राम पंचायत सदस्य शेखर कोहड़े यांचा जनतेची पार्टी मध्ये प्रवेश झाले आहे. आ. विनोद अग्रवाल तसेच जनतेची पार्टी चे प्रमुख पदाधिका-यांनी त्यांचे पार्टी मध्ये स्वागत केले आहे व या निमित्ताने त्यांना जनतेची सेवा करण्याचे व पार्टी चे कार्य करण्याचे सुचवले.
आ. विनोद अग्रवाल यांनी विधानसभा क्षेत्रामध्ये गाँव तिथे कृषि गोदाम, महिलांच्या स्वरोजगाराच्या दृष्टीने महिला बचत गट भवन, धान खरेदी केंद्रामध्ये धान विक्री करण्याकरीता स्वतंत्रता, गावातील शहराकरीता जाण्यासाठी पक्के रस्ते, कोट्यवधी निधीने हर घर जल, हर घर नल या योजनेच्या माध्यमातून पिण्याचे पाण्याची सोय, आमदार निधी अंतर्गत वाचनालयकरीता पुस्तके उपलब्ध करून देणे, वाढदिवसनिमित्त दिव्यांगजनाना मोटराईज ट्रायसिकल, कानाची मशीन, सर्वाधिक घरकुल मंजूर, प्रलंबित ऑनलाइन ७/१२ चे प्रश्न मार्गी, शेत पांदन रस्ता, सिटी सर्वे, रेलवे ब्रिज, डांगोरली येथे बंधारा बांधकाम, शहरातील पक्के रस्ते, पटवारी कार्यालय, घनकचरा प्रकल्प करीता स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे, विविध निधीतुन कोट्यवधी रूपये मंजूर करून विकासकामे, शहरातील मुख्य मार्ग, बाई गंगाबाई अस्पताल येथे रुग्णवाहिका, तसेच छात्रावास, गरजू लाभार्थ्याना अन्न धान्याचा पुरवठा करीता इष्टांग मंजूर करणे, असे बरेच ऐतिहासिक निर्णय घेउन त्यांनी जनतेची हिताचे कार्य केले आहे.
या दरम्यान आ.विनोद अग्रवाल, जनतेची पार्टी चे अध्यक्ष व कृ.ऊ.बा.समिती चे सभापती भाउराव उके, प.स. सभापती मुनेश रहांगडाले, ग्रामीण मंडल अध्यक्ष छत्रपाल तुरकर, महामंत्री प्रभाकर ढोमने, कृ.ऊ.बा.समिती चे संचालक, जितेश टेंभरे, कृ.ऊ.बा.समिती चे संचालक चेतन बहेकार, कृ.ऊ.बा.समिती चे संचालक राधाकृष्ण ठाकुर, कृ.ऊ.बा.समिती चे संचालक श्यामकलाबाई जितलाल पाचे, कृ.ऊ.बा.समिती चे संचालक, कौशलबाई छत्रपाल तुरकर, कृ.ऊ.बा.समिती चे संचालक, मुरलीधर नागपुरे, लिमेंद्र बिसेन, बबलू डोनेकर, सचिनसिंह बडगुजर, संचालक सेंट्रल कृषक,उपसरपंच काटी अनिल मते, धनीराम अंबुले, मुकेश हरिनखेड़े, शिव भोयर, व इतर अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते या दरम्यान उपस्थित होते.