गोंदिया, दी. 30 जुलै 2023 : शहरात क्रिकेट जुगारात कर्जबाजारी झालेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. निरज कुमार मानकानी वय २४ वर्ष रा. श्रीनगर गोंदिया असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण क्रिकेट सामन्यात पैसे गुंतवून जुगार खेळण्याचा हौसी होता. त्याने क्रिकेट सट्टेबाजीत खूप पैसा गुंतवला. कधी जिंकले तर कधी हरले असा संघर्ष करत, भूतकाळात सुमारे दीड कोटी रुपये हरल्यानंतर तो कर्जबाजारी झाला होता. गोंदिया वरून लोकसत्ताने 29 जुलै रोजी दिलेल्या माहिती नुसार जुगाराच्या पैशाची वसुली करिता सट्टेबाज त्याचा छळ करत होते. त्यामुळे अत्यधिक तणावाच्या परिस्थितीत नीरजला कोणताही मार्ग दिसत नव्हता.
त्याने गुंतवणूक केली रक्कम वसूल न झाल्याने तो तणावात होता. निराश होऊन निरज अशोक मानकानी यांनी राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रीनगर रहिवासी नीरज अशोक मानकानी चा एक भाऊ अमरावतीला राहतो आणि त्याच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते. नीरज हा त्याच्या आईसोबत गोंदियात राहत होता. २८ जुलै रोजी नीरजची आई विदर्भ एक्सप्रेसने नागपूरला निघाली.
आईचा निरोप घेतल्यानंतर घरी आल्यानंतर नीरजने स्वतःच्या घरात गळफास लावून घेतला. शेजारचे मित्र नीरजला घरी पाहण्यासाठी पोहोचले तेव्हा त्याचा मृतदेह लटकलेला दिसला, त्यामुळे गोंधळ उडाला आणि तत्काळ पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर गोंदिया शहर पोलिसांनी नीरजचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. नीरजच्या कुटुंबीचे कुणी ही पोहोचू न शकल्याने शवविच्छेदनाची कार्यवाही होऊ शकली नाही.
नीरज यांच्या मृतदेहाची आज २९ जुलै रोजी उत्तरीय तपासणी करण्यात आली. गोंदियामध्ये एका मोठ्या ऑनलाईन गेमिंग सट्टेबाजाचे पितळ उघडे झाल्यानंतर या क्रिकेट सट्टेबाजी प्रकारात आणखी किती जण बळी पडतात हे पुढे येणार. निरजच्या सोबत या अवैध धंद्यात कोण गुंतले होते, आणि कोणामुळे नीरजने आत्महत्या केली, की त्याची हत्या करून आत्महत्येसारखे भासवण्याचा प्रयत्न केला या बाबतचा तपास पोलीस करीत आहेत.
