सर्पमित्राला साप पकडण्याच्या द्रूष्टीने साहित्य देऊन सत्कार


गोंदिया, दी. 30 जुलै 2023 : गोंदिया तालुक्याअंतर्गत येत असलेल्या ग्राम मजितपूर येथील रहवासी सर्पमित्र नामदेव मेश्राम हे वयाच्या 14 वर्षांपासुन लोकांच्या घरी, दुकानात, गोडाऊन व इतर ठिकानी जर सांप निघाले तर सर्वप्रथम सर्पमित्र नामदेव मेश्राम यांना बोलावतात व ते सुरक्षित सांप पकडून जंगलात सुरक्षित सोडतात. ज्यामुळे सांपांना एक नविन जिवनदान देण्याचे काम सर्पमित्र नामदेव मेश्राम मागील 35 वर्षांपासुन करीत आहेत. त्यांच्या मुळे आज पर्यंत हजारों सांपांचे प्राण वाचलेले आहेत.

आपल्या जिवाची परवा न करता विना सुरक्षितते च्या ते साप पकडत आहेत. म्हणून त्यांना अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा संस्था एनजीओ एकोडी कडून सुरक्षित ते च्या द्रूष्टीने, जुत्ते हात मोचे, सांप पकड्यासाठी छड्डी व प्रोत्साहन राशि अकरासे रुपये ग्राम पंचायत कार्यालय मजितपूर येथील कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश ( राजू ) कटरे सामाजिक कार्यकर्ता, प्रमुख पाहूने माजी पंचायत समिति सदस्य प्रकाश पटले, भांडारकर गंगाझरी वन श्रेत्र सहायक, सरपंच नंदु आंबेडारे मजितपूर, सरपंच सोनू घरडे गंगाझरी, सरपंच पंकज अंबूले दांडेगाव, माजी सरपंच रविकुमार ( बंटी ) पटले एकोडी, सरपंच द्वारका साठवने खळबंदा, माजी उपसरपंच किरणकुमार मेश्राम, रंजित टेंभरे, राकेश बिसेन ग्राम पंचायत सदस्य, रगुविर सिंह उईके, हिरा तुमडाम, शोभा नारनवरे पोलिस पाटील, माजी सरपंच शारदा बघेले मजितपूर, दिनेश येरणे ग्राम पंचायत सदस्य, चंदन हरिणखेडे अध्यक्ष तंटा मुक्त समिति, प्रशांत मिश्रा, चानेश बिसेन, मुन्ना ठाकरे, संजय बावनकर व मोनू पठाण उपस्थित होते.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्ग दर्शन केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा संस्था (एनजीओ) एकोडी गोंदिया चे अध्यक्ष राजेशकुमार तायवाडे, उपाध्यक्ष आरिफ़ पठाण, सचिव टेकसिंह पुसाम, सहसचिव फुलवंता ठाकरे, दिलीप देशमुख व पोर्णिमा तायवाडे प्रयत्न केले.


 

Leave a Comment

और पढ़ें