शिक्षकाच्या घरावर पडली वीज!


सौंदड, दि. 27 जुलै : वादळ वाऱ्यासह पावसाने काल रात्री ( 26 जुलै रोजी ) जोरदार हजेरी लावली अश्यात अनेकांना धास्ती पडली होती की कुठे काय घडल तर नाही ना, मात्र सकाळी पाहिल्यावर खरच एका ठिकाणी काही घडल्याचे चित्र घरात राहणाऱ्या शिक्षक घर मालकाच्या लक्ष्यात आले. त्यांच्या राहत्या घरावर म्हणजे इमारतीच्या गच्चीवरील ( टॉवर ) वर वीज पडल्याने अक्षरशः सिमेंट ची भिंत फुटली त्याचे तुकडे जमिनीवर पडले. घटनेचे चित्र सकाळी 27 जुलै रोजी समोर आले.

गोंदिया जिल्हयाच्या सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येणारे ग्राम सौंदड येथे ही घटना बुधवारी 26 जुलै रोजी रात्री 11 वाजून 36 मिनिटांनी घडली. असे शिक्षकाने सांगितले. शिक्षक विजय डोये आणि त्यांचे भाऊ तलाठी मनोज डोये या दोन्ही भावांचा परिवार दोन माळ्याच्या या घरात राहते.

या घटनेत मोठी दुर्घटना देखील होऊ शकत होती मात्र “वेळ आला पण काळ आला नव्हता” त्या मुळे कुठलीही विपरीत दुर्घटना घडली नाही. रात्री झालेल्या भयंकर आवाजाने या घरात राहणारा परिवार देखील भयभीत झाला होता. तालुक्यात रात्री झालेल्या आवाजाने अनेकांची झोप सुध्दा उडाली. जिल्ह्यात काही दिवसा पूर्वी वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता. त्या मुळे भीतीचे वातावरण आजही नागरिकात आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें