- मित्रानेच केली मित्राची ऑनलाईन गेमिंग अॅप च्या माध्यमातून फसवणूक
- ५८ कोटी रूपये उकळले, आरोपी जैन फरार
गोंदिया, ( बबलू मारवाडे ) दिनांक : २४ जुलै २०२३ : ऑनलाईन गेमिंग अॅप च्या माध्यमातून नागपूरच्या तरुणाची गोंदियातील एका तरुणाने ५८ कोटी रुपयाची फसवून केली. हा प्रकार २२ जुलै रोजी उघड्कीश आला. फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या घरी नागपूर पोलिसांचा एक पथक आणि गोंदिया येथील पोलिसांचा एक पथक असे एकूण १४ पोलीस कार्यवाई दरम्यान उपस्थित होते. कार्यवाई सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली तर सायंकाळी आठ वाजे पर्यंत चालू होती. प्राप्त माहिती नुसार ऑन कॅमेरा की कार्यवाई करण्यात आली.
वृतांच्या माहिती नुसार कारवाई दरम्यान फायनल रिपोर्ट १६ कोटी रुपये रोख रक्कम, १२ किलो वजनाचे सोन्याचे बिस्कीट आणि २९४ किलो चांदी पोलिसांच्या हाती लागली आहे. प्राप्त माहिती नुसार कारवाई २२ जुलै च्या रात्री १२ : ३० वाजता पर्यंत चालली. असा एकूण २६ कोटी ८३ लक्ष रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नागपुर येथील क्राईम ब्रांच ने ही कारवाई केली आहे.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रसारमाध्यमांना झालेल्या कार्यवाई ची माहिती दिली आहे. दरम्यान आरोपी फरार असून, तो दुबईला पळून गेल्याची माहिती तरुण भारत ने दिली आहे. अनंत ऊर्फ सोन्टू नवरतन जैन असे आरोपीचे नाव आहे. गोंदिया शहराच्या शिव लाईन भागातील काका चौकात जैन यांचे घर आहे. जैन हा सट्टेबाज असून, त्याचा कपड्याचा व्यवसाय आहे. तरुण भारत च्या माहिती नुसार, नागपुरातील पीडित व्यापार्याशी त्याची मैत्री होती. कौटुंबिक घरोबा असल्याने पीडित व्यापार्याचा जैनवर विश्वास होता.
मात्र, जैनची नजर व्यापार्याच्या पैशावर होती. ( Gaming app ) ऑनलाईन गेमिंग अॅपवर रक्कम गुंतविल्यास झटपट लाखोंचा नफा मिळवून देण्याचे आमिष आरोपी जैन याने, व्यापारी मित्राला दाखविले. व्यापार्याने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. जैनला सायबरचे ज्ञान आहे. त्याचा फायदा घेत त्याने व्यापारी मित्राची रक्कम लुटण्यासाठी आधी एक टोळी तयार केली. नंतर स्वतःचे ऑनलाईन गेमिंगचे अॅप बनविले. जैन हा त्यांना बनावट लिंक पाठवायचा.
अशा बनावट लिंकवर पीडित व्यापार्याने जवळपास ६३ कोटी रुपये लावले. हे सर्व पैसे जैन ने उकळून मित्राचीच फसवणूक केली.
कोरोना काळात म्हणजे २०२१ मध्ये अॅप (Gaming app) सुरू झाले. पहिल्यांदा पीडित व्यापार्याने ५ लाख रुपये गुंतविले. त्यांना लगेच ८ लाख रुपयांचा नफा मिळाला. गेमिंग अॅपवर व्यापार्याचा विश्वास बसला आणि ते आरोपीच्या जाळ्यात अडकले. जैनने मित्राला जास्त रक्कम लावण्यास प्रोत्साहित केले. जैन हा बनावट लिंक मित्राला पाठवायचा. कमी रक्कम लावल्यास जिंकल्याचे भासवून जास्त रक्कम परत करीत होता. मोठी रक्कम लावल्यास हमखास हरवून पैसे उकळत होता. ५ ते १० लाख रुपये लावल्यास लगेच १५ ते १८ लाख रुपये परत करायचा, तर १ कोटीची रक्कम लावल्यास ऑनलाईम गेममध्ये हरवून पैसे उकळायचा.
आरोपी जैन हा बनावट लिंक (Gaming app) पाठवून आपल्याला हरवित असल्याचे व्यापार्याच्या लक्षात आले, तोपर्यंत त्यांचे ५८ कोटी रूपये जैनने उकळले होते. त्याने जैनला पैसे परत मागितले. मात्र, जैनने जीवे मारण्याची धमकी देऊन ४० लाखांची खंडणी मागितली. घाबरलेल्या व्यापार्याने सायबर सेलमध्ये तक्रार दिली.
पोलिसांनी गोंदियात जैनच्या घरी २२ जुलै रोजी छापा घातला. घरातून सोने, चांदी, आणि कोट्यावधी रुपयाचा घबाळ पोलिसांनी जप्त केला आहे. अनेक बातम्यांमध्ये मिळालेली रक्कम कमी ज्यास्त दिसत होती मात्र पोलिसांनी २३ जुलै रोजी फायनल रिपोर्ट बाबद माहिती माध्यमांना दिली आहे.
