तालुक्यात पेटी काॅन्ट्रक्ट चा धुमाकूळ; पुलाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे व संथगतीने सुरू


 सडक अर्जुनी, दिनांक : २३ जुलै २०२३ : तालुक्यात पेटी काॅन्ट्रक्टचा धुमाकूळ सध्या पाहण्यासाठी मिळत आहे. मुख्य काॅन्ट्रक्ट काम हातोहात विकून मोकळा होतो. आणि तोच काम पेटी काॅन्ट्रक्टर करतात, असे तालुक्यात अनेक हवसे गवसे पाहण्यासाठी मिळतात. बांधकाम निकृष्ठ दर्जाचे व संथगतीने होत अश्ल्याने सामान्य जनतेला रस्त्याने प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

सौंदड – चारगाव – परसोडी मार्गावर पुलाचे बांधकाम मागील ३-४ महिन्यापासून सुरू आहे. हा मार्ग गोंदिया – भंडारा सिमेवर दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा असल्याने या मार्गावर रात्रं दिवस वाहनांची वर्दळ असते. सदर पुलाचे बांधकाम, कंत्राटदार संथगतीने करीत असून काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे. बांधकामासाठी लागणारी सामुग्री पुरेपूर नसल्याने व बांधकामात वापरत असलेली रेती विना राॅयल्टीची असल्याने सौंदड पिपरी घाटातील रेती जशी जशी लागते तशी रेती रात्रीच्या वेळी आणली जाते.

पावसाळा लागून पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने पुलाचे बाजुने रहदारीसाठी बनविलेला पर्यायी रस्ता पाण्याने वाहून गेल्याने एखाद मोठी दुर्घटना होण्याचे चिन्ह दिसत आहेत. कंत्राटदाराने रस्त्याचे दोन्ही बाजूला सेप्टी भिंत बनवितांनी काॅलम न सोडल्याने सरळ भिंत तयार केल्याने भिंत एका बाजूने दबली जात आहे. रस्त्याचे दोन्ही कडेला गिट्टी, बोल्डर न टाकल्याने माती टाकून बुजविली गेली. आणि दाखविण्यासाठी वरून रेती, मुरूम टाकून बुजविण्यात आले.

रस्ता रहदारीसाठी सुरू झाल्यानंतर शेतक-यांचे ट्रॅक्टर ये-जा करणे अवघड होईल. सदर पुल सौंदड तलावाचा ओव्हर फ्लो ( रपटा ) चे पाणी जाण्याचा असल्याने पुलाचे दोन्ही कडेला बांधलेल्या सेप्टी भिंती पाण्याने व निकृष्ठ दर्जाचे बांधकामाने केव्हाही वाहून जाऊ शकतो. असे सुंदरी येथील पुलाचे लगत शेती असलेले शेतकरी झोळे यांचे म्हणणे आहे. सदर पुलाचे बांधकाम सार्व. बांधकाम विभाग साकोली व कंत्राटदार गोंदियाचे असल्याने काम पेटी काॅन्ट्रक्ट वर दिले आहे. असे काम पाहणा-या कंत्राटदाराचे दिवाणजी चे म्हणणे आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें