ऑनलाईन गेमिंग अँप च्या माद्यमातून 58 कोटि रुपयांची फसवणूक : आरोपी गोंदिया पोलिसांच्या ताब्यात.


गोंदिया, दि. 22 जुलै 2023 :  नागपूर येथील रहिवासी फिर्यादी यांनी सायबर पोलीस स्टेशन नागपूर येथे तक्रार दिली की आरोपी नामे – अनंत उर्फ सोनटू जैन रा. गोंदिया याने ऑनलाईन गेमिंग अँप च्या माद्यमातून फिर्यादीची 58 कोटि रुपयांनी फसवणूक केली. अश्या तक्रारीवरून नागपूर शहर पोलीसांनी आरोपी नामे – सोंटू जैन यांचे विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केलेला आहे.

गोंदिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपीचे शोध कामी नागपूर पोलीसांचे एक पथक आज 22 जुलै रोजी सकाळ पासून गोंदिया येथे आले व त्यांनी गोंदिया पोलीसांच्या सहकार्याने आरोपी नामे- सोनटू जैन रा. काका चौक, सिव्हिल लाइन्स गोंदिया चे घरी छापा घातला असता केलेल्या छापा कारवाईत मोठ्या प्रमाणात रोकड व सोन्या चांदी चे दागिने मिळून आलेले आहेत.

कारवाई दरम्यान मिळुन आलेली सदर रोकड व दागिने नागपूर पोलिसांच्या ताब्यात नागपूर येथे देण्याची कारवाई चालू आहे. सदरचा तपास नागपूर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनात चालू आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें