सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 21 जुलै : तालुक्यातील ग्राम तेली घाटबोरी येथे आज एक मोठी दुख:द घटना घडली आहे. त्या मुळे गावात शोक कळा पसरली आहे. शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या अंगावर आकाशातून अचानक विज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी तालुक्यात विजेच्या कडकडाटा सह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्या मुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे कामे बंद करून घरी परतले.
प्राप्त माहिती नुसार घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव ओमदास सखाराम वाघाळे वय 55 वर्षे रा. घाटबोरी तेली असे आहे. ही घटना आज 21 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी घडली आहे.
शेतकऱ्याची शेती शेजारील घाटबोरी कोहळी या गावाच्या शेत शिवारात आहे. गोंदिया जिल्हा हा भाताचा जिल्हा असल्याने सध्या शेतकरी भाताची लागण करण्यासाठी शेतात काम करीत आहेत.
भात रोवणी चे काम चालू असताना, शेतीत शेतकरी बैल जोडीने फण मारत असताना ही घटना घडली आहे. यात शेतकऱ्याचे शरीर भाजले आहे. या घटनेत शेतकरी शेतीच्या मध्य भागात काम करीत होता असे सांगण्यात येते तरी अंगावर विज कसी पडली आसा आश्चर्य वेक्त केला जात आहे. शेतकऱ्याला शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी परिवाराकडून होत आहे. घटनेचा पंचनामा तलाठी किशोर सांगोळे यांनी केला असून या बाबद तहसीलदारांना माहिती देण्यात आली आहे.
मृतक शेतकऱ्याचे पार्थिव शरीर तालुक्यातील शाकीय रुग्णालयात शववीच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर उद्या 22 जुलै रोजी दुपारी स्थानिक मोक्ष धाम येथे मृतकाच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
