स्टॉक च्या रेतीवर; रेती चोरांचा डल्ला; भर पावसात वाहतुक चालूच


सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 20 जुलै 2023 : पावसाळा सुरू असला तरी रेतीची तस्करी थांबण्याचे काही नाव घेत नाही. काही रेती चोरांचे पोटच यावल अवलंबून असल्याने भर पावसात सुधा रेतीची चोरी करून वाहतूक करतात. सौंदड, पीपरी, राका, या मार्गाने आता रेतीची चोरी चालू आहे. रात्रीला चोरी नियमात होते. मात्र आता दिवसा सुधा रेतीची चोरी थांबलेली नाही.

स्थानिक प्रशासनाचा यावर वचक नसल्याने चोरांची हिम्मत वाढत चालली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाळा लाग्ण्यापूर्वीच काही वाळू माफियांनी अनेक ठिकाणी रेतीचे ढीग करून ठेवले आहे. त्या मुळे आवश्यक असल्यास त्या जागेतून उचल करून ग्राहकांना पुरवठा केला जात आहे.

या वर्षी तालुक्यातील चुलबंद नदीचे फक्त एक पिपरी घाट रेती उपश्या करीता परवाना मिळाला होता. घाट मालकाने पावसाच्या भीतीने नदी घाटा बाहेर वाळू काढून ठेवली आहे. प्राप्त माहिती नुसार पाचशे ब्रास वाळू या ठिकाणी काढली आहे. ही वाळू ज्या मालकाची आहे. त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने या ठिकाणातून वाळूची चोरी होत आहे.

दुर्लक्ष करण्या मागे काही कारणं सुधा आहेत. ज्या वेळी ही वाळू उचल करण्या करीता परवाना मिळेल त्या वेळी असलेल्या वाळूच्या दहा पट वाळूची उचल नदी पात्रातून अवैध मार्गाने केली जाईल. हा काही नवीन प्रकार नसून.  तालुक्यात हा प्रकार दरवर्षी पाहण्यासाठी मिळते. त्या मुळे काही म्हसी राखणारे सुधा आता करोडपती झाले आहेत. तालुक्यात वाळू माफियांचा उच्छांद आजही सुरूच आहे.

मात्र प्रशासन बघ्याच्या भूमिकेत आहे. कुंपणच शेत खात असल्याने रक्षण कोण करणार असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. विशेष म्हणजे या वाहनावर नंबर राहत नाही. आणि पोलिस यावर कारवाई करीत नाही. आणि कुणी तक्रार केल्यास वाहनावर नंबर नसल्याने चोर कोण आहे ते समजू सकत नाही. असे उत्तर देतात.


 

Leave a Comment

और पढ़ें