- शिक्षक हितासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची मागणी – किशोर बावनकर जिल्हाध्यक्ष.
गोंदिया, दि. 20 जुलै 2023 : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समस्या निवारण सभा 18 जुलै रोजी संपन्न झाली.
जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनास आदेश. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनानुसार जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या बाबत खासदार सुनील मेंढे यांनी जिप गोंदिया येथे आयोजित शिक्षक समस्या निवारण सभेत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
यावेळी जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक गजभिये, शिक्षणाधिकारी माध्यमिक शेख, मुख्य वित्त व लेखा अधिकारी खोटेरे, सर्व खाते प्रमुख तसेच शिक्षकांच्या प्रश्नासाठी सहकार्य करणारे जिप चे गटनेते लायकराम भेंडारकर उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व शिक्षकेतर ( ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कृषी सहाय्यक, लिपिक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी ) कर्मचारी यांना सरसकट एकस्रर लागू करून थकबाकी अदा करणे, प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकी मागणी केलेल्या रकमेच्या पाठपुरावा करणे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे चार वर्षापासून रखडलेले चटो उपाध्याय.
व निवड श्रेणी प्रस्ताव त्वरित मंजूर करणे, रोस्टर मंजूर करून शिक्षकांच्या पदोन्नती करणे, DCPS बांधवांचे सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते प्रदान करणे, सर्व शिक्षकांना रजा रोखीकरणाचा लाभ देण्यात देण्यात यावे, OBC सह सर्व संवर्गाच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी कागदपत्रे मागवून विविध शिष्यवृत्ती मंजूर करणे आदि मागण्यासाठी खासदार सुनील मेंढे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली, जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व शिक्षकेतर ( ग्रामसेवक, आरोग्य सेवक, कृषी सहाय्यक, लिपिक व चतुर्थ श्रेणी ) कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या करीता समस्या निवारण सभेचे आयोजन केल्याबद्दल.
खासदार सुनील मेंढे व जिल्हा परिषदेचे गटनेते लायकराम भेंडारकर यांचे शिक्षक संघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. या सभेला महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक संघ गोंदिया जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर, शिक्षक नेते वीरेंद्र कटरे, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पटले, जिल्हा सरचिटणीस अरविंद ऊके, तालुका अध्यक्ष कैलास हांडगे व इतरही शिक्षक संघ पदाधिकारी हजर होते