“अग्रवाल कंपनी” च्या गलथान कारभारामुळे राष्ट्रीय महामार्गावर जाम!


सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे )  दिनांक : १८ जुलै २०२३ : आज सकाळ पासूनच राष्ट्रीय महामार्गावर वाहना मुळे जाम झाल्याचे चित्र आहे. नागपूर ते रायपुर महामार्ग क्रमांक ५३ वर अश्लेल्या देवरी ते सडक अर्जुनी परिसरात आज १८ जुलै रोजी संपूर्ण महामार्ग जाम झाल्याचे चित्र आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार राष्ट्रीय महामार्गावर अग्रवाल कंपनीचे बांधकाम चालू आहे. अश्यात महामार्गावर खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत.

सदर कंपनीने हे खड्डे पावसाळ्या आदी दुरुस्त करायला पाहिजे होते. मात्र त्यांनी खड्डे भरले नाही परिणामी अवजड वाहनाचे पटटे तुटतात. आज दोन वाहनाचे याच ठिकाणी पटटे तुटल्यामुळे डोंगरगाव डेपो पासून ते सावंगी बामणी पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. काही वाहन धारकांनी दिलेल्या माहिती नुसार गेली चार तासापासून या मार्गावर वाहनाचा जाम लागला आहे. तर पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार हा मार्ग सायंकाळ पर्यंत जाम राहणार आहे.

असे सांगितले आहे. त्या मुळे वाहन धारकांची मोठी तारांबळ होत आहे. पोलिस प्रशासन देखील कामाला लागला आहे. सशिकरन पहाडी परिसरात वन विभागाचे ठिकाण अश्ल्याने सिंगल मार्ग आहे. या मार्गावर ट्रक बंद पडल्याने संपूर्ण वाहतूक बंद झाला आहे. पोलीस प्रशासन एक एक वाहने सोडून मार्ग मोकळा करण्याचे काम करीत आहेत. अग्रवाल कंपनीने या ठिकाणी काम चालू केल्या पासून अनेक अपघात झाले आहेत. तर नियमित वाहनांचा चक्क जाम होत अश्ल्याचे चित्र आहेत.


आमचे कर्मचारी त्या मार्गावर खड्डे बुजविण्या करिता रोज काम करीत असतात. मात्र पावसामुळे खड्यातील मटेरियल वाहून जात अश्ल्याने काही वाहनामध्ये तांत्रीक बिघाड येत आहे. पावसाने उसंत दिल्यास तेथे संपूर्ण डांबर मार्ग नव्याने तय्यार करणार आहोत.

  • बिपीन श्रीवास्तव, स्ट्रकचर मेनेजर , अग्रवाल कंपनी, देवरी 

 

Leave a Comment

और पढ़ें