सौंदड वाशियांना गढूळ पाण्याचा पुरवठा


सडक अर्जुनी, दि. 17 जुलै 2023 : सौंदड ग्राम पंचायत अंतर्गत गावातील नागरीकांना पिण्याचे पाणी नल योजनेतून पुरवठा केला जातो. आता पावसाळा सुरू झाल्यापासून नागरीकांना नल योजनेतून गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे.

त्या मुळे गावातील नागरीक आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्राम पंचायत सौंदड येथील पाणी वाटप करणारे कर्मचारी अतुल दोनोडे यांना यावर आम्ही विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आता नदीला पुर असल्या मुळे तोच गढूळ पाणी पाणी टाकीत जमा होतो. आणि तोच पाणी नळ योजनेला पुरवठा केला जात आहे. आम्ही ब्लिचिंग आदी टाकून पाणी स्वछ करण्याचे प्रयत्न करतोय मात्र पाहिजे त्या प्रमाणात पाणी साफ होत नाही.

असे त्यांनी सांगितले मात्र नागरिकांच्या जीवाशी सर्रास प्रशासन खेळत असल्याचे यावरून लक्ष्यात येते. गढूळ पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही का ? असा सवाल देखील या निमित्ताने विचारला जात आहे.

ताप, जुलाब, उलटी, सारखे आजार पसरन्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या मुळे साहेब तुम्ही पण हाच पाणी घरी पिताय का असा सवाल आता गावातील नागरिक उपस्थित करीत आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें