सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दी. 16 जुलै 2023 : तालुक्यातील सर्वच राशन दुकानात जुलै महिन्यात नागरीकांना मक्का मिळणार आहे. शासनाकडून तालुक्यातील सर्व दुकान धारकांकडे मक्याचा पुरवठा करण्यात आला आहे. तर काही दुकान धारकांनी वाटप देखील चालु केली आहे. सध्या दर महिन्याला राशन अगदी मोफत मिळत आहे. त्यात गहू, तांदूळ यांचा समावेश आहे. आता मक्का सुध्दा राशन दुकानात या महिन्याच्या राशन बरोबर अगदी मोफत मिळणार आहे. काही दुकान धारकांनी त्याचे वाटप देखील चालू केली आहे.
जिल्ह्यात या वर्षी मक्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात झाले. 21,651 क्विंटल मक्का शासनाने खरेदी केला आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा कार्यालय कडून प्राप्त आहे. त्या मुळे शासनाने सर्व लाभारत्यांना जुलै महिन्यात मक्का वाटपाला सुरवात केली आहे. अश्यात लाभार्थी देखील मक्याची रोटी खाणार असल्याचे सांगत आहेत. अंतोदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रती card 5 किलो मक्का मिळणार आहे. तर प्राधान्य कुटुंब म्हणजेच ( बी. पी. एल. ) योजनेतील लाभार्थ्यांना प्रती युनिट 1 किलो मक्का मिळणार आहे. तालुक्यातच नाही तर गोंदिया जिल्ह्यातील सर्व राशन दुकानात या महिन्याला मक्का वाटप होणार आहे.
