- सौंदड च्या रेल्वे टोलीकडे जाणाऱ्या मार्गाची दयनीय अवस्था असी झाली आहे, हे आजचे चित्र आहे.
सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दी. 16 जुलै 2023 : सौंदड रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या मार्गाची गेली अनेक वर्षे पासून संपूर्ण दुर्दशा झाल्याचे चित्र आहे. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या मार्गाने जाणारे दुचाकी वाहन धारक, सायकल स्वार अनेकदा घसरून पडतात, त्यातच रेल्वे स्टेशन कडे जाणारा हा मार्ग असल्याने शेकडो प्रवाशी या मार्गाने जातात. अश्यात अनेक प्रवाशी देखील या मार्गावर घसरून पडल्याचे काही स्थानिक नागरिक सांगतात.
आता एखाद्याचा जीव गेल्यास प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल सामान्य माणसाकडून उपस्थित केला जात आहे. या मार्गावर पडलेले खड्डे भरण्यासाठी जुन महिन्यात मुरूम ऐवजी भिष टाकण्यात आले. पाऊस पडल्याने संपूर्ण भिष भीजले आणि चिखल निर्माण झाल. स्थानिक ग्राम पंचायत तर्फे हा भिष टाकण्यात आला होता. असे ही नागरिक सांगतात.
सौंदड राष्ट्रिय महामार्ग पासून रेल्वे टोलीकडे हा मार्ग जातो. एकूण एक किमी अंतर हा मार्ग आहे. तर हाच मार्ग रेल्वे स्टेशन कडे जाते. तर हाच मार्ग हनुमान मंदिर पासून शासकीय धान्य गोडाऊन कडे जाते. या मार्गाने नियमित अवजड वाहनांची वर्दळ असते. अश्यात या एक किमी मार्गाचे नविनिकरण व्हावे अशी अपेक्षा गेली अनेक वर्षे पासून आहे. मात्र प्रशासनाने अद्याप येथे मजबूत मार्गाची निर्मिती केली नाही.
विशेष म्हणजे भाजपचे पदाधिकारी आणि गावातील सरपंच असलेले हर्ष मोदी यांच्या घरापर्यंत या मार्गाचे नव निर्माण कार्य 2021 – 22 मध्ये झाले आहे. त्या मुळे नागरिकात विविध चर्चेला उधाण आले आहे. सध्या केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात आणि गावात देखील भाजपची सत्ता आहे. अश्यात गावाचा विकास झपाट्याने झाल पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांची आहे. गावात मंदगतीने विकास चालू असल्याने नागरिकात नाराजीचा सूर आहे. रेल्वे टोलीकडे जाणार्या मार्गाची तत्काळ दुरुस्थी करावी अशी मागणी होत आहे.
- सौंदड रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या अर्ध्या मार्गाचे बांधकाम गेल्या वर्षी केले आहे. तर अर्ध्या मार्गासाठी 15 लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्याच बरोबर बाजार वाडी पासून ते महामार्ग पर्यंत असलेल्या दुसऱ्या मार्गासाठी देखील 30 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या दोन्ही मार्गाचे नव निर्माण कार्य होणार आहे. काही तांत्रिक अडचणी मुळे काम थांबले आहे.
- : जी. प. सदस्य निशा तोडासे
