मला कोणतीही नोटीस शरद पवार साहेबांच्या तर्फे आलेली नाही : आमदार मनोहर चंद्रिकापुरे


गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दिनांक : १५ जुलै २०२३ : शरद पवार गटाने १२ आमदारावर कारवाईसाठी नोटीस बजावली असून त्यात गोंदिया जिल्हा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली अश्ल्याची माहिती माध्यावर झळकत आहे. मात्र अश्या प्रकारची कोणतीही नोटीस शरद पवार साहेबांच्या तर्फे मला आलेली नाही. आणि मला मिळाली नाही. तर नोटिस बद्दल मला माध्यमांच्या कडून नुकतेच कळलं आहे. पण प्रत्येक्षात अशी कोणतीही नोटीस मला मिळाली नसून ती कशाच्या संदर्भात आहे. हे मला माहीत नसल्यामुळे मी त्यावर कोणतेही भास्य करणार नसल्याचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे.



५ जुलै रोजी मुंबई येथे झालेल्या सभेत जे आमदार उपस्थित नवते अश्यान पेकी १२ आमदारांना नोटिस राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाकडून बजावण्यात आले आहे. अशी माहिती माध्यमातून समोर आली आहे. अश्यात गोंदिया येथील आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना विचारणा केली असता त्यांनी आपल्याला याबद्दल काही माहित नश्ल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.



राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून बुधवारी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन केलं गेलं. दोन्ही गटाकडे किती संख्याबळ हे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षात शरद पवार व अजित पवार गट असे उघड उघड दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून बुधवारी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. एच टी मराठी ने दिलेल्या माहिती नुसार या मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन केलं गेलं.

या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार गटाला जवळपास ४० ते ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याचं दिसून आल. तर शरद पवार गटाकडे केवळ १३ आमदारांचे संख्याबळ आहे. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर सभागृहात शरद पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण १३ विधानसभा आमदार, ३ विधानपरिषद आमदार आणि ५ खासदार उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे पक्षाचे दोन-तृतीयांश आमदार असल्याचं स्पष्ट झालं आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें