गोंदिया, दिनांक : १३ जुलै : जिल्ह्यात जून महिन्यात महावितरणच्या वतीने सर्व सामान्य लोकांनशह व्यापाऱ्यांना देखील वाढीव वीज बिल आल्याने वीज वितरण च्या विरोधात कॉग्रेस पक्षाने मोर्चा काढत निषेध केला आहे.
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जून महिन्याचे सर्व सामान्य लोकांना सरासरी पेक्षा जास्त बिल आल्याने नागरिकांना वीज देयके भरण्यास अडचण होत असून महाराष्ट सरकारने या कढे लक्ष द्यावे म्हणून आज १२ जुलै रोजी गोंदिया शहरात कॉग्रेस पक्षाच्या वतीने भोला भवन ते उप विभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत मोर्चा काढण्यात आला.
शेकडो लोक या मोर्च्यात सहभागी झाले असून उप विभागीय अधिकर्यांन मार्फत आपल्या मागण्याचे पत्र मुख्य मंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. यावेळी विविध घोषणा करीत राज्य सरकारवर आरोप देखील करण्यात आले आहेत. यावेळी कॉग्रेस प्रदेश सचिव अमर वऱ्हाडे, अरुण गजभिये कॉग्रेस नेता, राजीव ठकरेले कॉग्रेस नेता सह मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.
