जिल्ह्याला पहिल्यांदाच पूर परिस्थितीसाठी मिळाले सॅटेलाईट फोन


  • सॅटेलाइट चे 6 फोन उपविभागांना तर 4 जिल्हा प्रशासनाकडे 

गोंदिया, दिं. 12 जुलै : जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये नदी नाल्याना पूर येतो अश्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेक गावांच संपर्क तुटतो. अशावेळी नागरिकांशी संपर्क करण्यात प्रशासनाला मोठी दमछाक करावी लागते.



पूर परिस्थितीच्या काळात मोबाईल फोन द्वारा नागरिकांशी संपर्क करण्यास अनेक अडचणी येत असतात. पुरात फसलेल्या  नागरिकांना वेळेत मदत पोहचू शकत नाही. अश्यावेळी प्रशासन देखील हतबल झालेला असतोय. ही बाब लक्षात घेऊन मदत व आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे गोंदिया जिल्ह्याला पहिल्यांदाच दहा सॅटॅलाइट फोन मिळाले आहेत.

या सॅटॅलाइट फोन द्वारा पूर परिस्थिती च्या काळात नागरिकांसी संपर्क करण्यात किवा तेथील माहिती घेण्यास तसेच मदत पोहचिण्यासाठी फार मोलाची भूमिका आता राहणार आहे. यापैकी सहा सॅटॅलाइट फोन हे उपविभागास देण्यात आले. असून चार सॅटॅलाइट फोन जिल्हा प्रशासनाकडे ठेवण्यात आले आहेत.

आपातकालीन परिस्थितीमध्ये या सॅटलाईट फोनचा वापर त्या तालुक्यात करण्यात येणार आहे. ज्या तालुक्यात पूर परिस्थीत गरज आहे. तर हे सॅटॅलाइट फोन हाताळण्याचे प्रशिक्षण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून पूर्व परिस्थितीच्या काळात सॅटॅलाइट फोन आता फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. अशी माहिती स्मिता बेलपत्रे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें