राज्यातील पहिल्या पाचमध्ये गोंदिया जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे अर्जुनी मोर. ची निवड


  • केंद्र सरकारच्या गृह विभागाने केली निवड, वर्ष 2020 करिता अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याची निवड

गोंदिया, दिं. 08 जुलै : केंद्र सरकारच्या गृह विभागाने पोलीस स्टेशनमध्ये निकोप स्पर्धा वाढावी, तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिध्दी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवर 10 सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची उत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला होता.



त्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून करण्यात आली असून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पोलीस ठाणे हे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ठ पोलीस ठाणे ठरले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा विचार करून देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने, तसेच राज्यातील पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, गुणवत्ता वाढविणे दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे.

तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयाचा तपास, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलीस अधिकारी / अंमलदार यांना प्रोत्साहित करणे, इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी सन 2020 या वर्षापासून राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट 5 पोलीस ठाण्यांची निवड करुन सदर पोलीस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान करण्यात येते.

सध्या अर्जुनी मोर येथील पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक म्हणून विलास नाळे कार्यरत आहेत. त्यांनी पत्रकारांना माहिती देताना ही माहिती दिली आहे. ते पुढे म्हणाले 6 जुलै रोजी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्या वेळी गोंदिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर आदी उपस्थित होते. उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल कर्मचारी व अधिकारी यांचे यावेळी सत्कार करण्यात आले.


 

Leave a Comment

और पढ़ें