आजच्या सभेला अजित पवार यांच्या बंडखोर गटाने शरद पवार यांचा फोटो वापरला.


  • पक्ष आणि चिन्हावर अजित पवार गटाचा दावा… 

मुंबई, वृतसेवा, दिनांक : ०५ जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या बंडखोरांना त्यांचा फोटो न वापरण्याची सक्त ताकीद दिली आहे. ‘मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहे. त्या पक्षाने माझा फोटो वापरावा. अन्य कोणी परवानगी शिवाय फोटो वापरू नये’, असे आदेश शरद पवार यांनी दिले आहेत. तरिही अजित पवार यांच्या बंडखोर गटाने त्यांच्या वांद्रे येथील बैठकीत शरद पवार यांचा फोटो वापरला आहे.

मुंबईत आज राष्ट्रवादीच्या दोन बैठका झाल्या आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली होती तर एमईटी वांद्रे येथे अजित पवार यांनीही अशीच बैठक बोलावली होती. या बैठकांसाठी दोन्ही बाजूंनी जोर लावण्यात आला असून यानिमित्ताने शक्तिप्रदर्शनच पाहायला मिळाले आहे.

  • पक्ष आणि चिन्हावर अजित पवार गटाचा दावा

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर आता त्यांनी थेट पक्ष व पक्ष चिन्हावर दावा केला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी पक्ष व चिन्ह आमचेच असल्याचा दावा देखील केला. आता त्यासाठी ते निवडणूक आयोगाकडे धाव घेणार आहेत. बुधवारी अजित पवार यांनी त्यांच्या कार्यालयात समर्थकांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीनंतर अजित पवार गट पक्ष व चिन्हावर दावा ठोकणारी याचिका निवडणूक आयोगात दाखल करणार असल्याचे समजते.


 

Leave a Comment

और पढ़ें