अर्जुनी मोर. दिनांक : ०५ जुलै : नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना महात्मा ज्योतिबा फुले या यौजने अंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहन पर राशि मिळण्याची तरतूद आहे. असे अशले तरी गोंदिया जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशि मिळाली नाही, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अर्जुनी मोर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था चे आणि आदिवासी संस्था चे शेतकरी आजही प्रतीक्षेत आहेत. या योजनेत अनेक पात्र शेतकर्याना अध्यापही प्रोत्साहन पर राशी मिळाली नश्ल्याने ही अपूर्ण राहिलेली योजना पुर्ण करावी अश्या आशयाचे निवेदन जिलाधिकारी गोंदिया यांना दि. ४ जुलै रोजी देण्यात आले.
यावेळी उपस्थित ललित बाळबुध्दे अध्यक्ष विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अर्जुनी मोर यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष शंकर लोगडे, रमेश लाडे, विठ्ठल गहाणे, दुलिचंद लांजेवार, अनिल बागडे, लाला कापगते, श्रीमाला श्रीकांत डोंगरवार, सुनिता ताई झोडे यांच्या उपस्थिति मध्ये देण्यात आले, तरी तालुक्यातिल जे शेतकरी या योजने पासुन पात्र असुन वंचित आहेत त्यांनी एकजुट होऊन एकत्र येण्याची गरज आहे. असे आवाहन करण्यात आले.
