माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी गोरेगाव तालुक्यात राबविला महाजनसंपर्क अभियान


गोरेगाव, दिनांक : ३० जून : राजकुमार बडोले माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली महाजनसंपर्क अभियान गोरेगाव तालुक्यात राबविण्यात आला. यावेळी तालुक्यातील आंबेतलाव, कालीमाटी, हिराटोला, चिल्हाटी, बबई, म्हसगाव, भंडगा, मुंडीपार, पिंडकेपार येथे घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 9 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती, विविध कल्याणकारी योजना तसेच देश हिताकरिता घेतलेले निर्णय यांची माहिती घरोघरी जाऊन देत पत्रक वाटप केले.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा जि. प. सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, पंचायत समिती सभापती मनोज बोपचे, तालुका महामंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गिरधारी बघेले, माजी समाज कल्याण सभापती विश्वजित डोंगरे, माजी सभापती कृ. उ. बा. स. दुलीचंद बघेले, डॉ. मनोज वालदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष फनिद्र पटले, जिल्हा परिषद सदस्य प्रितीताई कतलाम, कृ. उ. बा. स. संचालक शारदाताई बडोले, जनसंपर्क अभियान प्रमुख शालिंदर कापगते, माजी पं. स. उपसभापती सुरेंद्र बिसेन, पं.स. सदस्य रामेश्वर मारवडे, डॉ. इंद्रराज बघेले, युवा मोर्चा महामंत्री रविद्र पटले, नुरेंद्र पटले, राजा कटरेसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें