प्रतिनिधी / सालेकसा ( राहुल हटवार ) दिनांक : ३० जून : तब्बल सात वर्षानंतर अखेर मुरकूडोह येथील जिल्हा परिषद शाळा पूर्ववत सुरू करण्यात आली. याच्या चांगलाच गाजावाजा करत नागरिकांना प्रशासन आपल्या सोबत आहे, असं संदेश देत थाटामाटात नवोगताचे स्वागत करण्यात आले. सन 2016 मध्ये मुरकुडूह येथील वर्ग एक ते चार पर्यंतची प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या अभावामुळे बंद करण्यात आली होती. विशेष म्हणजे तेव्हा मुरकुडोह पर्यंत जाण्यासाठी धड रस्ता सुद्धा उपलब्ध नव्हता. त्यामुळे या गावापर्यंत शिक्षक सुद्धा येजा करताना कंटाळत होते.
सुविधा पोहोचवणे शासनाला हलाखीचे झाले होते. त्यावर वृत्त प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री परिणय फुके यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक मोका चौकशीसाठी पाठविले. गावकऱ्यांच्या भेटीनंतर गावामधील विविध समस्यांचा आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यत्वे रस्ता आरोग्य आणि शिक्षण या तीन बाबींचा समावेश होता. यावर उपाय म्हणून क्षेत्राचे तत्कालीन आमदार संजय पुराम यांच्या माध्यमातून दलदलकुही ते मुरकुडोह क्रमांक १ पर्यंत रस्ता डांबरीकरण करण्याचे प्रस्ताव ठेवून जलद गतीने काम पूर्ण करण्यात आले.
दुसरीकडे सुरक्षा यंत्रणा मुरकुडोह येथील सशस्त्र दूरक्षेत्र सबळीकरणाचे काम सुद्धा हाती घेण्यात आले. आरोग्य आणि शिक्षण या दोन विषयांवर प्रशासन कमी लागले. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून आठवड्यातून एक दिवस फिरते दवाखाना मोबाईल व्हॅन पाठवून गावकऱ्यांना आरोग्य सेवा पुरवण्यात आल्या. परंतु शिक्षणाचा मार्ग काही सापडेना. सशस्त्र दूरक्षेत्र येथील उद्घाटना संबंधी सध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित असताना ही समस्या नागरिकांनी त्यांच्या समक्ष मांडली त्यावर तत्काळ उपाययोजना करत जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांना संपर्क सादर येथील बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू करण्याचे आदेश केले.
व प्रशासन परत कामाला लागले. आज ३० जून रोजी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी थाटामाटात शाळा परत सुरू करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. यशवंत गणवीर, माजी आमदार संजय पूराम, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) महेंद्र गजभिये, गट शिक्षणाधिकारी व्ही एस डोंगरे, शसस्त्र दूरक्षेत्र उपपोलिस निरीक्षक दिनेश बागुल, जिल्हा परिषद सदस्य गीता राऊत, विमल कटरे, छाया नागपुरे, पंचायत समिती सभापती प्रमिला गणवीर, सुनीता राऊत, अर्चना मडावी, रेखा फुंडे, गुमान सिंह उपराडे, विना कटरे, सरपंच जमानाबई मरकाम, उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते मुकेश इनवाते प्रामुख्याने उपस्थित होते. या शाळेवर प्रभारी शिक्षक म्हणून जी के मडामे व स्वं सेवक झनक टेकाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अडाणी फाऊंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप…
अदानी फाउंडेशन तिरोडा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दप्तर पाण्याची बॉटल असे साहित्य वाटप करण्यात आले. अदानी फाउंडेशन सीएसआर समितीचे प्रतिनिधी बीमुल पटेल यांच्यानुसार ही केवळ प्रथम प्रयत्न असून यापुढे सुद्धा विविध कामे या क्षेत्रात केले जाणार आहेत. यावर नागरिकांनी आरोग्य क्षेत्रात कामे करण्याचे आग्रह नागरिकांनी केले.
