सौंदड : दि. ३० जून : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथे दिनांक 30 जून 2023 ला सत्र 2023 – 2024 सत्राचा प्रवेश उतस्व साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मा. मधुसूदन अग्रवाल, पर्यवेक्षिका सौ. कल्पना काळे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल तसेच विद्यालयातील सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे आनंददायी पध्दतीने स्वागत केले. नविन प्रवेशित विद्यार्थ्यांनचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
तसेच त्यांना पाठयपुस्तके वितरित करण्यात आली. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मीठाई देण्यात आली. तसेच पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. शालेय वातावरणात विद्यार्थी खूप आनंदी व उत्साही होते. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचा परिचय करवून घेतल्यामुळे त्यांच्यात आत्मीयतेची भावना निर्माण झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने गीत गायन केले. विद्यार्थ्यांचे नवीन सत्रात बॅंड पेटीच्या संगीतावर स्वागत गीताने स्वागत करण्यात आले.
