- नागपुर येथील आताशा आशीर्वाद प्रा. ली. ही कंपनी काम करीत आहे.
सडक अर्जुनी, दिं. 29 जुन : तालुक्यातील ग्राम शेंडा ते सडक अर्जुनी या मार्गाचे काम गेली 3 वर्षा पासून चालू आहे. या 7 किमी लांब मार्गाच्या बांधकामासाठी तब्बल 28 कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आली आहे. गेली तीन ते चार वर्षा पासून या मार्गाचे बांधकाम चालू असले तरी सदर मार्गाचे बांधकाम आजही अर्धवट अवस्थेत आहे.
बांधकाम करणारी कंपनी नागपुर येथील आताशा आशीर्वाद प्रा. ली. असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाचे अधिकारी संचित शिंदे यांनी सांगितले की सदर बांधकाम काही तांत्रिक अडचणी मुळे रखडले आहे. तर सडक अर्जुनी शेंडा चौक येथील प्रकरण न्यायालयात आहे.
मुख्य मार्गावर मुरूम ऐवजी शेतातील माती टाकण्यात आली असल्या बाबद विचारणा केली असता त्यांनी ते पाहून संबंधितावर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. सदर माती केसलवाडा येथील कैलाश मुणेस्वर यांच्या घरा च्या मागे असलेल्या एका शेतातील काढण्यात आली असून ती माती नव्याने तय्यार करण्यात आलेल्या रेंगेपार ते सडक अर्जुनी मार्गाच्या कडेला टाकण्यात आली आहे. या बाबद खुद्द मुनेस्वर यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.
तर त्या ठिकाणी जेसीबी ने दहा फूट खोल खड्डा करण्यात आला आहे. परिणामी कड्ड्यात पावसाचे पाणी साचले आहे. या खड्ड्यात जनावरे किंवा लहान मुले पडण्याची भीती असल्याने त्यातच साचलेल्या पाण्यातून आजार पसरणार असल्याने तालुका तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. अश्यात तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की तक्रारीवर कारवाई करनार आहे.
विशेष म्हणजे रेंगेपार ते सडक अर्जुनी मार्गावर तय्यार करण्यात आलेल्या सिमेंट मार्गाच्या कडेला नुकतेच शेतातील माती टाकण्यात आली आहे. ही माती दिसू नये म्हणून मातीवर रेती टाकण्यात आली आहे. पावसाने भिजलेली माती दबली जात आहे. त्या मुळे कडेला गेलेल्या वाहन चालकांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बांधकाम विभागाचा हा भोंगळ कारभार असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांच्या जीवाशी हा खेळ मांडला जात आहे. गेली तीन वर्षे पासून सदर मार्गाचे काम रखडले आहे. ठीक ठिकाणी मार्गावर खड्डे पडले असल्याने त्या खड्डे मध्ये पाणी साचल आहे. अश्यात वाहनाचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच मार्गावर तय्यार करण्यात आलेल्या नाल्या मोकळ्या असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. अश्यात बांधकाम विभागाने तात्काळ काम पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व प्रवासियानी केली आहे.
