गोंदिया, दि. 27 जुन : देशा अंतर्गत आणि राज्यात अतिरेकी कारवायांच्या घटना घडत असताना जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्थेसाठी सर्वत्र ‘ मॉक ड्रील’ मोहीम राबवण्यात येते. एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जाण्याच्या दृष्टीने घ्यावयाची खबरदारी अशा मोहिमांमधून राबवण्यात येते. यातून प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे. यात काय उणिवा राहिल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. आणि पुढील काळात त्या होणार नाहीत याची दक्षता घेण्यात येते. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रात्यक्षिके घेण्यात येतात कोणत्याही दहशतवादी, आतंकवादी, नक्षलवादी, हल्याप्रंसगी प्रसंगावधान राखुन करावयाच्या कार्यपद्धती संबधाने मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात येते.
या अनुषंगाने बिरसी विमानतळ, गोंदिया येथे जिल्हाधिकारी गोंदिया चिन्मय गोतमारे, पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, बिरसी विमानतळ, गोंदिया चे प्रमुख डायरेक्टर शफीक शहा यांचे मार्गदर्शनाखाली बिरसी विमानतळ, गोंदिया येथे दिनांक 26/06/2023 रोजी सायंकाळी 17.00 वाजता अँटी हायजॅकिंग मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले होते.
सदरची अँटी हाय जॅकिंग मॉक ड्रिल ची रंगीत तालीम राबविण्यात येत असताना 3 सशस्त्र आतंकवादयांनी दहशत पसरविण्याचे उद्देश्याने आणि राज्य शासनास व जील्हा प्रशासनास वेठीस धरण्याकरीता अचानक रीत्या बीर्सी विमानतळ येथील प्रवासी विमानातील प्रवाश्यांना वेठीस धरले आहे. अशी माहीती विमानतळ सुरक्षा यंत्रणेकडून मिळताच गोंदिया जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचुन विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपायोजना म्हणून प्रवाशांची कोणतीही जिवीत आणि वित्तहानी न होवु देता आतंकवाद्यांना मॉक ड्रिल दरम्यान जेरबंद करून ताब्यात घेवून जखमींना तात्काळ अॅम्बुलन्स व्दारे दवाखान्यात पाठविण्यात आले. व वेठीस धरलेल्या प्रवाश्यांना पुर्वव्रत मोकळे करण्यात आले.
सदरची अँटी हाय जॅकिंग मॉक ड्रिल मध्ये बिडीडीस, आणि श्वान पथकाव्दारे विमानतळावर स्फोटक पदार्थ ठेवल्याची शक्यता असल्याने संपूर्ण विमानतळ परिसराची, प्रवशांचे सामानाची तपासणी करण्यात आली. फॉरेन्सीक लॅब मार्फतीने घटनास्थळाचे भौतीक दुवे तपासण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या तीन आतंकवाद्यापैकी दोन मृत आतंकवादयांचे शव दवाखान्यात उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आले. तर जिवंत पकडलेल्या एका आतंकवादयांस स्थानिक पोलीसांचे ताब्यात देण्यात आले. तसेच ट्राफिक अंमलदारांच्या मदतीने रस्त्यावरील गर्दी सुरळीत करण्यात आली. तसेच विमानतळ वरील झालेला गोंधळ मेगा फोन व्दारे सुचना देवुन नियंत्रणात आणण्यात आला.
(अँटी हायजॅकिंग मॉक ड्रील) रंगीत तालीमेत जिल्हाधिकारी गोंदिया चिन्मय गोतमारे, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे , अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, बिरसी विमानतळ, गोंदिया चे प्रमुख डायरेक्टर शफीक शहा, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, सुनील ताजने, पोलीस उपअधीक्षक मुख्या. श्रीमती नंदिनी चांदपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशत वाद विरोधी पथक, बिडीडीएस पथक, पोलीस मुख्यालय येथील पोलीस पथक, पो. ठाणे रावणवाडी, गोंदिया ग्रामीण येथील पोलीस पथक, अंगुलीमुद्रा विभाग, विमान सुरक्षा बल व स्टाफ, वैदयकीय स्टाफ, अग्निशामक दल व जलद कृती दल (क्युआरटी), दंगल नियंत्रण आरसीपी 2 पथके ) , बिनतारी संदेश विभाग, मोटर परिवहन विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा सुरक्षा शाखा, जिल्हा विशेष शाखा, नक्षल सेल येथील पोलीस अधिकारी अंमलदार इत्यादींनी सहभाग नोंदविला. अँटी हायजॅकिंग मॉक ड्रील रंगीत तालीम दरम्यान कोणत्याही प्रकारची ईजा अथवा हानी झालेली नाही. सदरची रंगीत तालीम ही दिनांक- 26/06/ 2023 चे सायंकाळी 17. 02 वाजता पासून ते 18.05 वाजेपर्यंत घेण्यात आली.
भविष्यात आतंकवाद्यां कडून, नक्षलवाद्यांकडून अतिरेकी दहशतवादी कारवाया हल्ला झाल्यास पोलीसांनी काय करावे तसेच नागरीकांनी प्रसंगावधान राखुन काय काळजी घ्यायला पाहीजे याबाबत सदरचे रंगीत तालीमव्दारे दर्शविण्यात आले. तसेच भविष्यात नागरीकांनी जागरुक राहुन अतिरेकी आतंकवाद, नक्षलवाद, दहशतवादा संबधी काहीही माहीती, सूचना प्राप्त झाल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष, गोंदिया फोन क्र. 07182- 236100, आणि डायल 112 वर संपर्क करुन कळवावे असे आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलांच्या वतीने करण्यात येत आहे.
