सौंदड, दि. 26 जुन : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २६ जून २०२३ ला संस्थापक जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने व प्राचार्य मधुसूदन अग्रवाल यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाच्या पर्यवेक्षिका कल्पना काळे, प्रमुख अतिथी म्हणून जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिंदे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल,शारीरिक शिक्षिका कू. यू. आर. बाच्छल उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथिंनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पर्यवेक्षिका कल्पना काळे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, विद्यालयातील सहाय्यक शिक्षक कू. एन. डी. अलोणे, सहाय्यक शिक्षक श्री. टी. बी. सातकर, प्राध्यापक जी.एस. कावळे यांनी भाषणातून राजर्षी शाहू महाराज यांनी समाजासाठी केलेल्या बहुमूल्य कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कू.यू. बी. डोये यांनी केले तर आभार प्राध्यापक श्री.पी.एस. कापगते यांनी मानले.