गोंदिया, दि. 26 जुन : राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे गोंदिया जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विस्तारित कार्यकारिणीची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, महिला जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर, यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. खा. प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने अभिनंदन करण्यात आले व भव्य सत्कार समारंभ करण्याबाबद चर्चा करण्यात आली.
गोंदिया जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस चे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने बूथ कमेटी मध्ये महिलांना स्थान देण्यात यावे. सर्व तालुक्यातील महिला तालुका कार्यकारिणीचा आढावा घेण्यात आला. वर्तमान स्थितीत अनेक समस्या असून घरगुती गॅस, वाढती महागाई, घर चालवण्यास महिलांना होत असलेली काटकसर हे सर्व चिंतनीय विषय आहेत. आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या पुढाकाराने महिलांनी राजकारणात पुढे यावे याकरिता आरक्षण दिले गेले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिलांप्रती असलेल्या ध्येय धोरणाचा प्रचार व प्रसार करावा. प्रत्येक तालुक्यात महिला कार्यकारिणीचा विस्तार करून जास्तीत जास्त महिलांना पक्षात स्थान देण्यात यावे असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.
या प्रामुख्याने राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, अविनाश काशीवार, राजलक्ष्मी तुरकर, माधुरी नासरे, सुशीला भालेराव, अश्विनी पटले, किरण ताई कांबळे, रजनी गौतम, आशा पाटील, सुमन बिसेन, पार्वताबाई चांदेवार, कल्पना बहेकार, मंजू डोंगरवार, निता रहांगडाले, शीला ब्राह्मणकर, जयश्री पुंडकर, कविता रहांगडाले, इंदू परशुरामकर, अनिता तुरकर, ललिता पुंडे, कल्पना शेवटे, अफरोज शेख, संध्या श्रीरंगे, छाया टेकाम, क्रिष्णा कोरे, शुभांगी वाढवे, अनिता बांबोडे, वंदना थोटे, चित्रलेखा मिश्रा, अनिशा पठाण, सुनीता जयस्वाल, माधुरी पिंपळकर, कविता ठवरे, अर्चना बनसोड, वनिता मेश्राम, माधुरी बनपूरकर, हर्षा राऊत, आम्रपाली डोंगरवार, जया भरणे, शालू बनपूरकर, पुस्तकला माने, सीमा भालेराव, छाया टेकाम वंदना बनसोड, हेमलता उईके, कौतिका कावळे, लक्ष्मी येडे, उषा हर्षे, विजया मिश्रा, कांताबाई राहिले,
शमीला टेंभुर्णीकर, अर्चना ताराम, प्रमिला गावड, सुनिता वसाके, सीमा साखरे, सुमन बिसेन, पुष्पा रहांगडाले, पुष्पा मस्के, इंदिरा लाडेकर, वैभवी ताराम, सरिता सलामे, प्रभाताई चौधरी, लक्ष्मी मेश्राम, श्यामकला कुमोठे, कुंतन पटले, ललिता ताराम, स्वाती वालदे, रंजना बारेवार, रंजना बारेवार, श्रद्धाताई रहांगडाले, रामेश्वरी रहांगडाले, उषाताई रामटेके, अनिता राहिले, अर्चना चौधरी, संगीता माटे, अनिता मेश्राम, संध्या गजभिये, मंगला नंदेश्वर, सायली वाघमारे, सोनम मेश्राम, अंजू फुले, तृप्ती वाघमारे, शारदा नारनवरे, निर्मला मेश्राम, सुनिता घरडे, कुसुम रामटेके, एकता मेश्राम सहित महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
