लोहारा, देवरी, ( नवलशिंग पवार ) दि. 24 जुन : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाल्याचे असून येत आहे. आज 24 जुन रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील ग्राम लोहारा येथील रहिवासी असलेले सुनील पोगळे अंदाजे वय ३५ वर्षे आणि सेवकराम पोगळे अंदाजे वय ६० वर्षे हे दोघेही बाप लेक नागपूर वरून स्वगावी लोहारा येथे येत असतांना भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक देवून चिरडल्यामुळे भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सदर घटनेमुळे लोहारा गावात शोककळा पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार डोंगरगाव डेपो नजीक एका ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वाहनाला धडक दिली यात बाप लेकाला पूर्णतः चिरडून टाकले.
अपघात एवढा भीषण होता की दुचाकी वरील दोघेही बापलेकाचे शरीर पूर्णतः छिन्नभींन झाले. नागपूर वरून आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 35 डब्ल्यू 0328 गाडीने स्वगावी देवरी तालुक्यातील लोहारा येते येत असताना ट्रक क्रमांक सी.जी.08 ए.के. 8822 मागच्या बाजूने दुचाकी स्वाराला धडक दिली. त्यामुळे दुचाकी वरील दोघेही बाप लेक ट्रकच्या खाली आले. ही घटना देवरी पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असून पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत.
