सडक अर्जुनी, दि. 24 जुन : तालुक्यात गेली अनेक दिवसापासून पुष्पा गँग सक्रिय आहे. त्या मुळे मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची अवैध रित्या कत्तल केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. सागवान वृक्षांची कत्तल प्रकरणी बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकारांना धमक्या दिल्या जातात. हे सर्व कुणाच्या आशीर्वादाने चालते हे सांगण्या सारखे नाही.
तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय आहे. लाखो रुपयांचा महिन्याला पगार घेणारे वन विभागाचे कथित अधिकारी चिरी मिरी घेतात की काय? असा प्रश्न देखील तालुक्यातील सामान्य माणसाला पडला आहे. वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव यांच्या कार्यकाळात तालुक्यात “पुष्पा गँग सक्रिय” झाल्याची तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
एवढच नाही तर यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 जवळ असलेल्या राखीव वन जमिनीवर सर्रास पणे एका कंपनीने आपले संसार थाटून सिमेंट ब्रिक्ष तय्यार करण्याचे काम वर्षभर पासून सुरू ठेवले होते. मात्र वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश जाधव यांना हे दिसले नाही. पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले मला माहिती मिळाल्या नंतर मी तात्काळ कारवाई करून सर्व साहित्य जप्त केले आहे.
खर सांगायचं म्हणजे साहेब दुसर्याच कामात वेस्त आहेत. आता सहवनक्षेत्र शेंडा अंतर्गत बीट पांढरवाणी येथील शेतीला लागून पी. एफ. ६७१ संरक्षित राखीव जंगलात अवैध वृक्षतोड करण्यात आली आहे. याप्रकरणाची २२ जुन रोजी तक्रार क्षेत्रसहायक शेंडा यांना देण्यात आली आहे. पांढरवाणी येथील शेतकरी शैलेश मदनलाल ऊईके, हौसलाल धनलाल नागपूरे यांची शेती पी. एफ. ६७१ संरक्षित राखीव जंगलाला लागून आहे. सध्या शेतीचे हंगाम सुरू असून शेतीचे कामे करण्यासाठी कातलवाई ( रिठी ) बीट पांढरवाणी येथे शेतात गेले असता त्यांच्या शेतीला लागून संरक्षित राखीव जंगलात अवैध वृक्षतोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
सदर सौरक्षित राखीव जंगलातील सागवन झाडे या शेतक-यांनी तोडले असा गैरसमज वनविभागाला होऊ नये म्हणून या प्रकरणाची तक्रार क्षेत्रसहायक शेंडा यांना सदर शेतक-यांनी रीतसर केली आहे. वनविभागाने संरक्षीत राखीव जंगलात होत असलेली वृक्षतोड थांबवावी व होणारा जंगलाचा -हास कमी व्हावा.
आणि केलेल्या अवैध वृक्षतोडीचा पंचनामा करून सदर सागवन झाडे वनविभागाचे कार्यालयात जमा करावे. आणि या अवैध वृक्षतोडीचा तपास करून वृक्षतोड करणा-या टोळीचा शोध घेऊन त्यांचेवर वन गुन्हा दाखल करून कारवाई करावी. सध्या सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोडीचे प्रमाण वाढत असून अवैध वृक्षतोड चि चर्चा संपूर्ण वनपरिक्षेत्रत गाजत आहे.
नेहमी वृत्तपत्रात सडक अर्जुनी वन परिक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीच्या बातम्या येत असतात. मात्र याकडे वरिष्ठ वन अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने वनतस्कर खुलेआम संरक्षित राखीव जंगलातील मौल्यवान लाकडांची वृक्षतोड करीत आहेत. या वनतस्करांना वनविभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे वरदहस्त असल्याचे बोलल्या जाते. चक्क आरा या साहित्याने रात्रीला वृक्षांची कत्तल करून पडलेल्या झाडांचे देखील तुकडे करण्यात आले आहे.
तेवढच नाही तर वन विभागातील अन्य ठिकाणी सागवान झाडांची कत्तल करून कापलेल्या झाडांच्या बुडावर माती लावण्यात आली आहे. या पूर्वी याच भागातील वृक्षांची अवैध रित्या कत्तल करण्यात आली होती. त्याची माहिती विचारणाऱ्या पत्रकारांना एका ठेकेदाराने बातमी लावल्यास कापून टाकीन अशी धमकी दिली होती. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्याना अजूनही अवैध रित्या झाडे कापणारा आरोपी सापडला नाही. विशेष म्हणजे वन विभागाची कसून तपासणी केल्यास कोट्यावधी रुपयाचा घबाड बाहेर निघेल हे खरे…