अवैध सागवान वृक्षांची कत्तल प्रकरणी; बातमी लावल्यास त्या पत्रकाराला कापून टाकीन!


सडक अर्जुनी, दिं. 19 जुन 2023 : अधिकाऱ्यांचे आणि अवैध काम करणाऱ्या कथित लोकांचे आपसी संबंध असतात यात काही शंकाच नाही. सडक अर्जुनी तालुक्यात वनविभागाच्या आशिर्वादाने सांगवन वृक्षांची कत्तल करून चोरी केली जात असल्याचे चित्र आहे. तर वन विभागाच्या जागेतील रेतीची देखील चोरी होत असल्याचे चित्र आहे.

मात्र अधिकाऱ्यांच्या विरोधात पत्रकारांनी बातमी प्रकाशित केल्यास  अधिकारी व कर्मचारी पत्रकारांना मारण्याची यौजना करीत असल्याचे प्रकार समोर येत आहे. 16 जुन रोजी दिलेल्या लेखी निवेदनात तसे उल्लेख आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन तहसीलदार, ठाणेदार, वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले आहे.

प्रकरण आहे की – तालुक्यातील ग्राम शेंडा परिसरातील काही नागरिकांनी पत्रकारांना माहिती दिली की शेंडा परिसरात वन विभागाच्या जागेत अवैध रित्या सागवान वृक्षांची कत्तल करून ते अवैध मार्गाने विकण्याच्या तयारीत आहेत. यात स्थानिक अधिकारी व वन कर्मचारी शामील आहेत.

त्या प्रकरणाची विचारपुस करण्याठी आणि बातमी संकलन करण्यासाठी तीन पत्रकार सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येणारे ग्राम शेंडा येथील वनपाल फिरोज खान पठाण यांना 26 मे रोजी भेटले. मात्र पत्रकारांना उडवा उडवीचे उत्तर देण्यात आली. पत्रकारांनी निवेदनात आरोप केल आहे. की वनपाल पठाण व वनरक्षक नरेश पातोडे यांनी ठेकेदार राहुल राऊत यांना पत्रकार आपल्याकडे अवैध झाडांची कत्तल प्रकरणी विचारपूस करण्यासाठी आल्याची माहिती दिली आहे.

 

त्या मुळे अश्लेष मांडे यांना भ्रमण ध्वनी वर संपर्क करून तु माझी बातमी प्रकाशित करू नको. लालसिंग चंदेल यांना फोन करून सांग. चंद्रमुनी बन्सोड याला मी कापून टाकीन व सडक अर्जुनीच्या सगळ्या पत्रकारांना उचलून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

धमकी देणारे राहुल राऊत हे लाकूड ठेकेदार असल्याचे तक्रारदार यांचे सांगणे आहे. त्यातच कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय की वनरक्षक आणि वनपाल यांना आम्ही टक्केवारी देतोय तेव्हा कुठे ते काम करण्याची परवानगी देतात. आणि अवैध रित्या झाडांची कत्तल केली तरी काही बोलत नाही. धमकी देणाऱ्या राऊत विरोधात तक्रार ०१ जुन रोजी देवरी पो.स्टे. ला देण्यात आली आहे. तर या प्रकरणाची ऑडियो रेकॉर्ड सुध्दा समोर आली आहे.

शेंडा, पांडरवाणी, कोयलारी, येथील संपूर्ण शासकीय जंगलाची चौकशी करून वनपाल, वनरक्षक यांना त्वरीतः निलंबित करावे कारवाई न केल्यास महाराष्ट्र पत्रकार संघ वनपरिक्षेत्र कार्यालय कोहमारा च्या प्रांगणात उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें