भारतातील पहिले केबल स्टे – ब्रीज आणि विवींग गॅलरी अंभोरा येथे : खा. सुनील मेंढे


भंडारा, दिं. 18 जुन : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला तब्बल ९ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने मोदि@९ सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या महाजनसंपर्क अभियानाच्या अंतर्गत ‘विकासतीर्थ दर्शन’ भंडारा – गोंदिया लोकसभा अंतर्गत येणारे आंभोरा ता. जि. भंडारा येथील पुलाच्या पूर्ण झालेल्या बांधकामाला माजी मंत्री राजकुमार बडोले आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनिल मेंढे यांच्यासह अनेकांनी विकास कामांना १७ जुन रोजी भेट दिली.



भारतातील पहिले केबल स्टे – ब्रीज अंभोरा ता. जी. भंडारा येथे तय्यार झाले असून त्याचे लोकार्पण सोहळा काही दिवसात संपन्न होणार आहे. त्याच बरोबर कोरंबी येथे वैनगंगा नदीवर नविल पुलाची निर्मितीचे काम देखील जोमात चालू आहे.

समुद्रात ज्या प्रमाणे बांधकाम केलं जाते त्याच प्रमाणे या ठिकाणी पुलाची निर्मितीचे काम कोट्यावधी रुपयाची निधी खर्चून तय्यार केलं जातं असल्याची माहिती खासदार सुनील मेंढे यांनी दिली आहे. ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्य काळाला तब्बल ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यांच्या काळात पूर्ण झालेल्या वेशिष्ट्य पूर्ण विकास कामांना भेटी देण्याचे काम आम्ही करीत आहोत. अंभोरा येथे प्राचीन देवस्थान आहे. त्याच बरोबर तीर्थ स्थान आहे. नद्यांचे संगम आहे. दोन जिल्ह्यांना जोडणार्या पुलाची निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. स्थानिक लोकांची या ठिकाणी मागनी होती.

या पुलाच्या वरील भागात म्हणजे 50 ते 60 फुटावर्ती विविंग ग्यालरीची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांना नदीच्या संगमाचे दर्शन घेता येणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व नितीन गडकरी जी यांच्या संकल्पनेतून पूर्ण झालेलं आहे. देशातील आगळ वेगळ बांधकाम आमच्या भंडारा जिल्हात देखील आहे. हे जनतेला माहीत होणे अपेक्षित आहे. दरम्यान ते पत्रकारांना माहिती देताना बोलत होते.

यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार केलं यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले, खासदार सुनील मेंढे, तरिक कुरेशी माजी सभापती म्हाडा, सिसुपाल पटले माजी खासदार, मुकेश यांथराटे ज्येष्ठ नेते, उल्हास फडके ज्येष्ठ नेते, लायकराम भेंडारकर गटनेता जी. प. गोंदिया, बापू ठवकर, कविता रंगारी जी. प. सदस्य गोंदिया, संगीता खोब्रागडे सभापती सडक अर्जुनी, विजय कापगते, शालिंदर कापगते उप सभापती, प्रशांत खोब्रागडे, सूर्यकांत इमले आदी उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें