सडक अर्जुनी, दि. 18 जुन : आपल्या मनाचा जर ताबा निश्चित आहे. तर कोणतेही वाईट व्यसनाच्या आहारी माणूस जात नाही. व असाच मनावरील ताबा एकदा निश्चितच केला. तर सुखी समाधानी व आनंदी जीवन आपण जगू शकतो असे प्रतिपादन न्यायमुर्ती न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड यांनी ( १८ जून.) रोजी सौंदड/रेल्वे येथे अल्कोहोलीक्स एनॉनिमस निर्णय समुह सौंदड समुहाच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते.
माणसांनी मद्यमुक्त जीवन जगावे, त्यातून काही जीवनात बदल होतो व का बदल झाला.? त्याआधी व्यसनाधीन जीवनात काय काय व कोणते दुःख भोगले, कोणत्या समस्या उदभवल्या, आणि आता मद्यमुक्त जीवन जगण्यासाठी जी समुहबांधवांची संजीवनी मिळाली व याच संजीवनीने मन पार बदलून टाकले ती संजीवनी म्हणजे (एए) अल्कोहोलीक्स एनॉनिमस.
या समुहाचा सौंदड/रेल्वे येथील जमनादास लोहिया महाविद्यालयात पाचवा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी न्या. डॉ. विक्रम आव्हाड हे होते. अध्यक्षस्थानी जमनादास लोहिया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगदीश लोहिया, अतिथी डुग्गीपार पोलीस ठाणे निरीक्षक आर. के. सिंगनजूडे, सरकारी अधिवक्ता ॲड. हटकर, ॲड. बन्सोड, ॲड. घाटबांधे, सरपंच तथा उद्योगपती हर्ष मोदी, पंकज लोहिया व अन्य मान्यवर हजर होते.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना न्यायाधीश मा. डॉ. विक्रम आव्हाड म्हणाले की सर्वात प्रथम आपल्या मनावर पूर्ण ताबा असणे आवश्यक असते, मनाला वाटेल हे काम नाही तर मन ते कार्य करणारच नाही, कारण मनाचा ब्रेक हा अगदी उत्तम ब्रेक असतो. जग फार सुंदर आहे, आपल्या या सुंदर जगात पारीवारीक सुख सौंदर्य अजून बघायचे आहे प्रत्येक माणसाने मनावर ताबा निश्चित करून मद्यप्राशनांपासून दूर राहिले पाहिजे. या अल्कोहोलीक्स एनॉनिमस समुहाच्या सदस्यांनी जे शेयरींग आत्मकथन येथे केले आहे.
अगदी वास्तवपू्र्ण आणि हकीकत सांगितली आहे. आणि (एए) अल्कोहोलीक्स एनॉनिमस समुहाचा हा ५ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सर्व सदस्यांना सहाव्या वर्षात पदार्पण निमित्त हार्दिक शुभेच्छाही दिल्यात. या सोहळ्याला गडचिरोली, चंद्रपूर, आमगांव ( गोंदिया ), देसाईगंज, लाखांदूर, गोंदिया, साकोली व सौंदड येथील १५० च्या वर ए.ए. चे सदस्यगण उपस्थित होते. कार्यक्रमात प्रास्ताविक गोंदिया ए.ए. चे अजय यांनी तर संचालन प्रमोद एम यांनी केले आणि आभार ए.ए. सौंदड निर्णय समुह सदस्य गुलाब एस यांनी केले.