सडक/अर्जुनी, दिनांक : १८ जून २०२३ : तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक कोहमारा स्थित एरिया 51 येथे माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, जिल्हा बूथ प्रमूख नरेश माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत १६ जून रोजी संपन्न झाली. बैठकीत खा. प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबाबद्दल तालुक्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. सोबतच आगामी काळात सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्याला यशस्वी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सोबतच पक्ष संघटनेवर चर्चा करून नव्याने बूथ कमेटी तयार करणे व बूथ कमिटीमध्ये युवकांना व महिलांना प्राधान्याने स्थान देणे, पक्ष वाढीकरिता संघटनेला मजबूती प्रदान करणे याबाबद पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आली.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, अविनाश काशिवार, रमेश चुर्हे, सौ.सुधा रहांगडाले, डॉ रुकीराम वाढई, डॉ अजय लांजेवार, डी यु रहांगडाले, शिवाजी गहाणे, मंजुषा डोंगरवार, रजनी गिऱ्हेपुंजे, वंदना थोटे, छाया मरस्कोल्हे, अनिता बांबोळे, उमराव मांढरे, देवाजी बनकर, विजय मेश्राम, खिलोज दोनोडे, ईश्वर कोरे, ओमराज दखने, चंद्रशेखर चांदेवार, मुकेश कोरे, देवानंद कोरे, डॉ सेवकराम रहांगडाले, नीरज मेश्राम, केदार चव्हाण, रतनभाऊ डोंगरवार, नरेश मौजे, नामदेव डोंगरवार, मुन्ना बोरकर, शामराव वासनिक, दामोधर बोपचे, रंगलाल पटले, राजेंद्र आरसोडे, राहुल मेश्राम, भूमेश्वर राणे, रमेश करचाल, प्रदीपकुमार मेश्राम, दिनेश कोरे, दुर्योधन मरस्कोल्हे, शामराव गेडाम, आस्तिक परशुरामकर, भोलानाथ कापगते, मुनेश्वर कापगते, ओमप्रकाश टेम्भूर्णे, राजेश फुले, उमेश कापगते, अमीन शेख, घनश्याम गजबे, प्रशांत बालसमावर, नरेश कापगते, अफरोज शेख, चंदूभाऊ बहेकार, दिलीप कापगते, भागवत झिंगरे, राहुल यावलकर, कृष्णा ठलाल, जगन्नाथ लंजे, विलास लंजे, दिलीप वैद्य, अनिल भेंडारकर, रामकृष्ण नान्हे, मंगेश नागपुरे, सत्यवान नेवारे, महेश बोरकर सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
