मुंबई, वृतसेवा, दिनांक : १७ जून : महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मुदत पूर्ण झालेल्या आणि विनंती बदल्या झालेल्या आहेत. मुदत पूर्ण झालेल्या ३३६ आणि विनंतीनुसार ११३ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या आज १६ जून रोजी करण्यात आल्या. अशा एकूण ४४९ पोलिस निरीक्षांच्या बदल्या पोलिस विभागाने केल्या आहेत.
राज्य पोलीस दलात फेरबदल करण्याचे सत्र सुरू आहे. जून महिन्यात सुरू करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती आणि बदलीनंतर गृह विभागाने शुक्रवारी राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या 449 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या 449 पोलीस निरीक्षकांमध्ये मुंबईतील 79 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली आदेशाची प्रत संबंधीत पोलीस अधिकारी यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेश गृह विभागाने दिले आहे. न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे आदेशाचा भंग होणार नाही. याची पोलीस निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे. बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी गैरहजर राहतील त्यांना स्थित कार्यमुक्त करण्यात यावे, व त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा असे आदेशात म्हटले आहे.