ACB Trap : औषधी दुकानाची परवानगी देण्यासाठी मागितली लाच!


भंडारा, दिं. 15 जुन 2023 : १५ हजार रुपयांची लाच स्विकारणा-या भंडारा शहरातील अन्न व औषध पुरवठा विभागातील औषध निरीक्षक प्रशांत रामटेके (४६) याला एसिबी ने रंगेहाथ पकडले. तक्रारदार डॉक्टर असून आपल्या भावसुनेच्या नावाने शहरातील कीर्ती मल्टिस्पेसिएॅलिटी हॉस्पिटलमध्ये औषधीचे दुकान सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे त्यांनी अर्ज दिला होता. फार्मसीच्या त्या परवान्याच्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुट्या न काढल्यामुळे परवाना मंजूर झाला.

त्यामुळे मोबदला म्हणून २० हजार रुपये द्यावे, अशी मागणी प्रशांत रामटेके याने केली. यावर तडजोड करून १५ हजार रुपयात हे प्रकरण ठरले. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास रामटेके याने हॉस्पिटलच्या कॉम्लेक्समध्ये येऊन १५ हजार रुपयांची रक्कम स्विकारून खिशात टाकताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या शिपायांनी त्याला रकमेसह अटक केली.

या प्रकरणी रात्री उशिरा भंडारा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर आणि पोलीस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित डहारे आणि पथकाने पार पाडली.


 

Leave a Comment

और पढ़ें