ग्रामसेवकांच्या मानधनात 10 हजार रुपयेची वाढ!


मुंबई, वृत्तसेवा, दि. 14 जुन : कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात 10 हजार रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय आज 13 जुन रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या या ग्रामसेवकास 6 हजार रुपये दरमहिना मिळतात, आता ते 16 हजार एवढे मिळतील.

राज्यात सध्या 27 हजार 921 ग्रामपंचायती असून 18 हजार 675 नियमित ग्रामसेवकांची पदे आहेत. त्यापैकी 17 हजार 100 पदे भरली असून 1575 पदे रिक्त आहेत. वर्ष 2000 पासून ग्रामसेवकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतात.

कृषी सेवक, ग्राम सेवक, शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ झाल्यामुळे कंत्राटी ग्राम सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव होता. यापूर्वी वर्ष 2012 मध्ये वाढ करण्यात आली होती. यासाठी 1 कोटी 57 लाख 50 हजार रुपये इतका आर्थिक भार पडेल.


 

Leave a Comment

और पढ़ें