रेती तस्करीची बातमी प्रकाशीत करणार्या पत्रकाराना अश्लिल शिवीगाळ


  • पत्रकार संघाचे ठाणेदाराला निवेदन कारवाईची मागणी…  

गडचिरोली, दिं. 14 जुन 2023 : कुरखेडा तालूक्यात सूरू असलेली अवैध रेती तस्करी तसेच तहसिलदार कूरखेडा यांचा कार्यवाहीत रेतीची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आलेले ३ ट्रेक्टर जप्तीची  कार्यवाहीची बातमी वृत्तपत्रात प्रकाशीत केल्याचा राग मनात ठेवत पत्रकाराना अत्यंत अश्लील शब्दात शिवीगाळ करीत दम देणारा या व्यवसायाशी संबधित असलेल्या इसमावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आज मंगळवार रोजी स्थानिक पत्रकार संघाचा वतीने पोलीस स्टेशन कूरखेडा येथे ठाणेदार संदीप पाटील यांची भेट घेत निवेदना द्वारे मागणी करण्यात आली.

तालूक्यात मोठ्या प्रमाणात अवैध विटा भट्टी, रेती उपसा सूरू आहे. या संदर्भात वेळोवेळी स्थानिक पत्रकाराकडून बातम्या प्रकाशीत करण्यात येतात. विशेषता सतीनदीच्या काठावर असलेला कूंभीटोला हा गाव रेती तस्करीचा केंद्र बिंदु आहे. कूंभीटोला घाट व येथील स्थानिक काही वाहतूकदार अवैध रेती तस्करी करीता कूख्यात आहेत.

नूकतीच येथील तहसिलदार यानी आपल्या चमू सह मध्यरात्रि सापळा रचत रेती तस्करी करताना तिन ट्रक्टर पकडले ही बातमी सूद्धा वृत्तपत्रात प्रकाशीत करण्यात आली होती. हा राग मनात ठेवत या व्यवसायाशी संबंधित असलेला कूंभीटोला येथील इसम देवानंद रेवनाथ नाकाडे याने कूंभीटोला येथीलच निवासी असलेल्या एका पत्रकाराचा घरासमोर त्यांचा घरातील महिला व अन्य पूरूष मंडळी उपस्थित असताना अश्लील व अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ पत्रकाराना उद्देशून करीत होता.

यावेळी या शिवीगाळची दहा मिनटाची आडीओ क्लीप सूद्धा रेकार्डिंग करण्यात आलेली आहे. सदर माहीती व तक्रारीचे निवेदन ठाणेदार संदीप पाटील याना देण्यात आले. यावेळी कायद्यान्वये संबंधित इसमावर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यानी पत्रकार संघाला दिले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज पठान, सचिव नसीर हाशमी, सह सचिव प्रा विनोद नागपूरकर, सदस्य विजय भैसारे, महेन्द्र लाडे, कृष्णाजी चौधरी, ताहीर शेख, शिवा भोयर, चेतन गहाणे, सूरज गावतूरे उपस्थित होते.

पत्रकाराना शिवीगाळ करणारा देवानंद नाकाडे हा गूंड प्रवृत्तीचा असून यापूर्वी सूद्धा त्याचा विरोधात कूरखेडा पोलीस स्टेशन येथे शिवीगाळ व भांडण प्रकरणात ३ वेळा अदखल पात्र गून्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. मात्र त्याचा विरोधात ठोस कार्यवाही न झाल्याने त्याची हिम्मत वाढलेली आहे. तालूक्यात रेती तस्करी हा अवैध व्यवसाय संघटीत पणे करण्यात येत असल्याने या अवैध व्यवसायाचा बातम्या प्रकाशीत करणार्या पत्रकारावर तस्कराकडून गंभीर हल्ल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामूळे वेळीच यांचा मूस्क्या आवळणे गरजेचे आहे सदर बाब सूद्धा चर्चे द्वारे पत्रकार संघाच्या पदाधिकार्यानी ठाणेदार संदीप पाटील यांचा निदर्शनात आणून दिले.


 

Leave a Comment

और पढ़ें