फोटो काढणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना वाळू माफियांची बेदम मारहाण!


  • खांबाला बांधून पोलिसांना मारहाण, पाच आरोपी ताब्यात! 

गोंदिया, दि. 13 जुन 2023 : जिल्हयाच्या आमगाव तालुका येथील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना काही वाळू चोरांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दोन पोलीस कर्मचारी रात्र पाळीत कर्तव्यावर असताना. ही मारहाण केल्याची माहिती आहे.



प्राप्त माहितीनुसार अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करीत असताना. वाहन धारक वाळू माफियांनी ट्रॅक्टर जागेवरच खाली करीत. वाहन पळून नेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान घटना स्थळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी सदर वाहनाचा फोटो काढला. याचा राग मनात धरून वाळू माफियांना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नायलॉन दोरीने एका खांबाला बांधून अश्लील शिवीगाळ करीत काठीने व थाापड बुुक्क्यानी मारहाण केली आहे. तर पोलिसांचा मोबाईल देखील हिसकवला होता. ही घटना दि. 10 जुन रोजी शनिवारी रात्रीच्या सुमारास आमगाव तालुक्यातील ग्राम भोसा येथे घडली.

या प्रकरणी पाच आरोपींना आमगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर अन्य आरोपी फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात पोलीसच सुरक्षित नाही. तर सामान्य माणूस कसा सुरक्षित राहणार असा सवाल सामान्य माणसाला पडला आहे.



आमगाव तालुका हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा लागत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेजारील राज्यातून अवैध धंदे होत असतात. आणि जिल्ह्यात होणाऱ्या अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन हा दिवस, रात्र पेट्रोलिंग करून अवैध धंदे कसे थांबवता येतील याबाबत कार्यकरत असते. पण मुजोर झालेले अवैध धंदे करणारे माफिया पोलिसानाच जर मारहाण करत असतील. तर कायदा व सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे.

यात मारहाण करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव विजय चूनीलाल कोसमे व प्रवीण मोगरे असे आहे. हे दोन्ही पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना अवैध धंदे करणाऱ्या लोकांनी यांना मारहाण केली. या मारहाणीत दोन पोलीस जखमी झाले. या विषयी आमगाव पोलीस स्टेशनला माहिती मिळताच इतर पोलीस त्या ठिकाणी पोहचले, पोलिसांना पाहताच आरोपीने त्या ठिकाणातून पळ काढला.



पोलिसांच्या दाखल तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी कारवाई करीत आरोपी नामे : भुमेर्श्वर बुधराम ब्राह्मणकर, सुनील भुमेर्श्वर ब्राह्मणकर, अनिल भुमेर्श्वर ब्राह्मणकर, मनोहर फरकुंडे, संतोष ब्राह्मणकर या पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा व भादवीच्या विविध कलमान अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास आमगाव पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनात चालू आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें