तालुक्यातून रात्रीला रेतीची अवैध वाहतूक सुरूच!


  • फुटाळा गावात अवैध रेतीची डंपिंग! 

सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) , दि. 12 जुन 2023 : तालुक्यातून सातत्याने रेतीचा अवैध रित्या उपसा करून वाहतूक केली जाते. या बाबद आम्ही अनेक वृत्त प्रसिद्ध केले. असले तरी तालुका प्रशासनाची कर्यवाई सून्य आहे. तालुका प्रशासन नामा मात्र कारवाई करून पत्रकारांची दिशा भूल करण्याचे प्रयत्न करीत आहे. तालुक्यातून विविध नदी व नाल्यातून रेतीचा अवैध रित्या उत्खनन सुरू आहे.

प्राप्त माहिती नुसार सडक अर्जुनी तालुक्यातील फक्त एक रेती घाट लिलाव झाले आहे. यात ग्राम पीपरी येथील चुलबंद नदी घाटाचे लीलाव रेती वाहतूक करण्यासाठी एका कंपनीला झाले आहे. मात्र रेती वाहतूक करणे आणि रेतीचा नदीपात्रातून उपसा करण्याची काही विशिष्ट कालावधी ठरली असते. म्हणजे सायंकाळी 6 ते सकाळी 6 या कालावधीत रेतीचा उपसा करता येत नाही तर वाहतुक देखील करता येत नाही.

असे असले तरी रात्री 10 नंतर ते सकाळी 7 वाजता पर्यंत रेतीचा उपसा करून रेतीची वाहतूक केली जात असल्याचे चित्र आहे. ग्राम राका, पीपरी , परसोडी या मार्गाने रेतीचे ट्रक रात्रीला चालतात. काही गावकऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार दररोज रेतीचे ट्रॅक या भागातून सुरू असतात.

अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने नियम धाब्यावर ठेऊन हा गोरख धंदा गेली एक महिन्यापासून सातत्याने चालू आहे. तालुक्यातील विकलेला महसूल प्रशासन या गोष्टींकडे लक्ष देणार का ? असा सवाल सामान्य माणसाला पडला आहे. रात्रीला गावातून चालणाऱ्या ट्रॅक मुळे गावकऱ्यांची झोप उडून जाते. त्यामुळे गावकरी देखील रोष वेक्त करीत आहे.

  • व्हायरल ऑडियो क्लिप… 

एका व्हायरल ऑडियो नुसार तालुक्यातील एका अधिकाऱ्याला साडे तीन लाख रुपये रेती माफियांनी दिल्याचे दोन लोकांच्या चर्चेतून समजते. अवैध रेेतीचे वाहनावर कारवाई न करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली असे यावरून लक्ष्यात येते. आता हा कथित अधिकारी कोण ? ते सोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही ऑडियो क्लीप लवकरच महाराष्ट्र केसरी न्युज प्रशिद करनार आहे. कथित अधिकारी मंथली घेऊन गाड्या लावतात असे त्या क्लीप मध्ये उल्लेख आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें