प्रतिनिधी / अर्जुनी मोर, दिनांक : ०५ जून २०२३ : गोंदिया जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर युथ फाउंडेशन अर्जुनी मोरगाव तसेच माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या तर्फे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे प्रेरणात्मक व्याख्यान चे आयोजन सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव येथे दि. ५ जून २०२३ सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आले असून जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील बरेच युवक व युवती स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असून त्यांना योग्य मार्गदर्शन लाभावे यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून आपला प्रशासकीय सेवेचा अनुभव देखील मांडणार आहेत. सोबतच काही निवडक विद्यार्थ्यांना प्रश्न देखील आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना विचारण्याची संधी मिळणार आहे.