रेल्वेच्या भीषण अपघातात २८८ मृत्यु तर ११७५ हून अधिक जख्मी!


बालासोर, दिनांक : ०४ जून २०२३ : ओडिशा राज्याच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी ६.५० वाजता शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू- हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, मालगाडी तीन रेल्वेगाड्यांना झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांची संख्या २८८ वर पोहोचली असून ११७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

त्यातील ५६ लोक गंभीर जखमी असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ओडिशातील रेल्वे अपघातासाठी कारणीभूत असलेल्या कोणालाही आम्ही सोडणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. त्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली, तसेच जखमींची विचारपूस केली.

प्राप्त माहिती नुसार कोरोमंडल ताशी १२८ किमी वेगाने धावत होती. तिने मालगाडीला जोरदार धडक दिल्याने या गाडीचे डबे रुळावरून घसरले. त्याचवेळी विरुद्ध दिशेने बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस ताशी ११६ किमी वेगाने येत होती. ती कोरोमंडल एक्स्प्रेसच्या रुळांवरून घसरलेल्या डब्यांवर धडकली. या अपघातातील मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून १० लाखांची, तर गंभीर जखमींना दोन लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर झाली. त्या शिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें