ट्रकच्या अपघातात महिला ठार! तर पती सह चिमुकली किरकोळ जखमी.


गोरेगाव, दि. 29 मे 2023 : महामार्ग पोलिस केंद्र डोंगरगाव हद्दीतील कोहमारा ते गोंदिया जाणारे नेशनल हायवे 753 वरील मुंडीपार गावाजवळ मोटार सायकल क्र. एम.एच. 33 आर 3544 ही कोहमारा कडून गोंदिया कडे जात असताना मोटर साइकिल चालकाने ब्रेक मारल्यानंतर मोटर साइकिल स्लिप झाल्याने मोटर साइकिल वर मागे बसलेली पायल घनश्याम लाखनकर वय 24 वर्ष रा. मानापुर तह. आरमोरी जिल्हा गडचिरोली ही खाली पडून समोरून येणारा ट्रक क्र. यु.पी. 70 एफ. टी. 5419 च्या मागील टायर मध्ये आल्याने जागीच मरण पावली.

मोटार सायकल चालक घनश्याम लाखनकर वय 31 वर्ष व त्याची मुलगी वय 4 वर्ष हे या अपघातात किरकोळ जखमी झाले. ही घटना आज सकाळी 9.20 वाजताच्या सुमारास घडली. मयत चे मृतदेह ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मोटर साइकिल अनियंत्रित होऊन अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. वाहन धारकावर पोस्टे गोरेगांव येथे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें