सडक अर्जुनी, दी. 26 मे 2023 : सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपा – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला एकहाती स्पष्ट बहुमत प्राप्त झाल्यानंतर आज सभापती व उपसभापती निवड संपन्न झाली. नवनिर्वाचित सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे डाॅ. अविनाश काशिवार तसेच उपसभापती पदी भाजपचे विश्वनाथ रंहागडाले यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
भाजपा महायुती सरकारच्या विकासात्मक धोरणांच्या तसेच मतदारांनी, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी टाकलेला हा विश्वास त्यांच्या कार्यातून सार्थकी होईल याची खात्री वाटते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढील विकासात्मक काम काजासाठी राजकुमार बडोले माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य यांनी शुभेच्छा. दिल्या याप्रसंगी सडक अर्जुनी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, नूतन संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकी काळात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाची युती या ठिकाणी होती. काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार आज या कार्यकारिणीत समाविष्ट झाल्याचे माजी मंत्री बडोले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. एकंदरीत 18 सदस्यांची बॉडी सर्व पक्षीय मिळून पूर्ण झाली. राष्ट्रवादी काँग्रेश पक्षाचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष गंगाधर परसुरामकर आणि माजी आमदार राजेंद्र जैन यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी आपल्या पक्षातर्फे मतदारांचे आभार मानले.
