सडक अर्जुनी, दी. 25 मे 2023 : तालुक्यातील ग्राम बाम्हणी /ख. अंतर्गत येणाऱ्या कृषि सहायक कार्यालय मार्फत बाम्हणी येथील शेतकरी गटास बिजप्रक्रीया यंत्राचे वाटप दि. 23 मे रोजी करण्यात आले. कृषि विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात खरीप पूर्व तयारीसाठी बिजप्रक्रीया, माती नमुने, बियाण्याची निवड, पूर्व मशागत अश्या बाबींचा शास्त्रीय अभ्यास व प्रचाराचे काम सुरु आहे. त्या अनुष्ण्घाने तालुका कृषि अधिकारी किरणताई बडोले यांनी बाम्हणी येथील युवा उन्नती शेतकरी व पुतळी येथील युवा मराठा शेतकरी गटास ५०% अनुदानित बिजप्रक्रीया यंत्राचे वाटप केले.
त्या करिता तालुक्यात 2 शेतकरी गटाची निवड करून कृषि सहाय्यक राजशेखर राणे यांच्या सहायाने बिजप्रक्रीया प्रात्यक्षिक करून घेतले व बिजप्रक्रीया करण्याचे महत्व व फायदे युवा शेतकर्यांना सांगितले.
या प्रसंगी गावचे सरपंच विलास भाऊ वट्टी , शुभम मेश्राम कृषि सहाय्यक कार्यालय व्यवस्थापक , शोभा परशूरामकर , रुपाली चुटे अजय मेश्राम, नीलकंठ चुटे , टिकाराम चुटे गोपाल जमदाळ, किशोर तरोने, शंकर खोटेले, श्यामराव चुटे योगेश कोरे, नरेश जमदाळ, लोकेश तरोने, प्रवीण तवाडे, हेमराज लंजे, चंद्रशेखर सुरसाऊत , विश्वनाथ तरोने, सर्व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.