- घरकुल हस्तांतरणाचा ठराव देण्याकरीता लाभार्थ्याला मागितली सात हजार रूपयाची लाच…
भंडारा, वृत्तसेवा, दि. 24 मे 2023 : ग्राम पंचायतीने घेतलेला घरकुल हस्तांतरणाचा ठराव देण्याकरीता लाभार्थ्याला सात हजार रूपयाची लाच मागणाºया ग्राम पंचायत सचिव ( ग्रामसेवक ) व ग्राम पंचायतीच्या शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहात अटक केली.
धनंजय रामचंद्र लांजेवार, वय ३५ वर्ष, पद- ग्रामसेवक व लालचंद गोपीचंद चकोले , वय ४९ वर्ष, पद – शिपाई, ग्रामपंचायत नवेगाव (बूज), तालुका- मोहाडी असे लाचखोर अधिकारी-कर्मचाºयांची नावे आहेत.
तक्रारदार हे नवेगाव (बु.) येथील रहिवाशी असुन अगोदर त्यांच्या यातील वडिलांच्या नावाने घरकुल मंजूर झाले होते. मात्र तक्रारदार यांचे वडीलाचा मृत्यू झाल्याने सदरचे घरकुल ग्रामपंचायत च्या ठरावावरून आईच्या नावाने हस्तांतरीत झाले. दरम्यान तक्रारदार यांची आई सुद्धा मृत्यू पावल्याने सदर घरकुल तक्रारदारांच्या नावाने हस्तांतरीत करण्यासाठी ग्रामपंचायत चा ठरावाची आवश्यकता होती.
त्याकरीता तक्रारदाराने ठरावाकरीता लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे तयार करून ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक धनंजय रामचंद्र लांजेवार यांच्याकडे जमा केले. मात्र ग्रामपंचायतींने घेतलेल्या ठरावाची प्रत देण्याकरिता ग्रामसेवक लांजेवार यांनी ग्राम पंचायतीचे शिपाई लालचंद्र चकोले यांच्यामार्फत तक्रारदाराकडे सात हजार रुपये लाचेची मागणी केली. भंडारा पत्रिका ने 22 मे रोजी दिलेल्या माहिती नुसार
तक्रारदाराने याची भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्या तक्रारीच्या आधारे एसीबीच्या अधिकाºयांनी सापळा रचुन ग्राम पंचायत शिपाई लालचंद चकोले यास ७ हजार रूपयाची लाच स्विकारतांना रंगेहात अटक केली. याप्रकरणी पोलीस स्टेशन करडी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर कारवाई ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूरचे पोलीस अधीक्षक, राहुल माकणीकर , अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते, भंडारा लाप्रवि चे पोलीस उप अधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के,पो हवा मिथुन चांदेवार, अंकुश गाढवे ,पोलीस नायक अतुल मेश्राम, शिलपेंद्र मेश्राम, पोलीस अंमलदार चेतन पोटे, विवेक रणदिवे, मयूर शिंगणजुडे, चालक राहुल राऊत यांनी केली पुढील तपास पोनि.अमित डहारे हे करीत आहेत.
