सडक अर्जुनी, दिनांक : २३ मे २०२३ : खासदार सुनील मेंढे दिव्यांग साहित्य वाटप शिबीर व जनता दरबारला उपस्थित राहण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावकडे सोमवार २२ मे रोजी सकाळी घरून निघाले होते. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाच्या दिशेने जात असताना महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. ताफ्यातील एका वाहनाला ट्रेलरने दिलेल्या धडकेत वाहनाचे मोठे नुकसान झाले.
सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांच्या ताफ्यातील इनोव्हा गाडी क्रमांक एम. एच. ३६ झेड ७७७० या गाडीला अपघात झाल्याने. एका बाजूने गाडी खरचटली. दोन ट्रेलर चालकांचे भांडण सुरु असताना तिच्या मागे असलेल्या ट्रेलर चालकाला दुसऱ्या ट्रकचालकाने गाडीखाली ओढले. यामुळे गेअरमध्ये असलेला ट्रक खासदारांच्या ताफ्यातील वाहनाला घासत गेला. त्या मुळे अपघात सदृश्य चित्र निर्माण झाले होते. कुठलीही हानी झाली नाही हे विशेष.
