दिव्यांगानाही स्वबळावर उभे राहता यावे : खासदार सुनील मेंढे


अर्जुनी मोर., दिनांक : २३ मे २०२३ : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग आणि एआयडीपी उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य वाटप शिबिराचे आयोजन दि. २२ मे रोजी करण्यात आले होते. ग्राम विकासातून लोक कल्याण संकल्पनेवर आधारित विविध योजना आणि उपक्रम राबवित ग्रामोन्नती साधण्याचा ध्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. दिव्यांगानाही स्वबळावर उभे राहता यावे यासाठी साहित्य वाटपाची योजना तेवढीच महत्त्वाकांक्षी असल्याचे मत खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले.

लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांसाठी साहित्य वाटप शिबिर घेतले जात आहे. नुकतेच वात्सल्य सभागृह, अर्जुनी मोरगाव येथे १९२ लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.

या प्रसंगी खासदार सुनील मेंढे, राजकुमार बडोले माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, मंजुशाताई बारसागडे नगराध्यक्ष न. पं. मोर/अर्जुनी, सविताताई कोडापे सभापती पं. स. मोर/अर्जुनी, होमराज पुस्तोडे उपसभापती पं. स. मोर/अर्जुनी, शालिंदर कापगते उपसभापती सड़क/अर्जुनी, ललीताताई टेंभरे उपनगराध्यक्ष न. पं. मोर/अर्जुनी, रचनाताई गहाणे जि. प. सदस्य, जयश्रीताई देशमुख जि. प. सदस्य, कुंदाताई लोगडे पं. स. सदस्य, भाग्यश्वरीताई सय्याम पं. स. सदस्य, शालीनीताई डोंगरवार पं. स.सदस्य, आम्रपालीताई डोंगरवार पं.स. सदस्य, पुष्पलताताई द्रुगकर पं. स. सदस्य, संदीप कापगते, डॉ. जाजुक कुंभरे, नुतन सोनवाने, किशोर बागडे तहसीलदार मोर/अर्जुनी, निमजे सर, मुरलीधर ठाकरे, गजानन डोंगरवार व समस्त दिव्यांग बांधव उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें